Laborers weeding the cotton crop sown during the kharif season in Shiwar. In the second photograph, irrigation of horticultural cotton is in progress. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : तळोदा तालुक्यात हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात! 24 हजार 920 हेक्टर क्षेत्राचे नियोजन

Nandurbar News : तालुक्यात शेतशिवारात खरीप हंगामाची उत्सुकता लागली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

फुंदीलाल माळी

तळोदा : तळोदा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असून, बागायती शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र कपाशीची लागवड केली आहे, तर पेरणीयोग्य पाऊस येण्याची वाट पाहत इतर खरीप पिकांचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. त्यासाठी मशागत करून शेती तयार ठेवली आहे.

पाऊस झाल्यानंतर सोयाबीन, तांदूळ, करडई, तूर, मका या पिकांची पेरणी केली जाणार आहे. दुसरीकडे तालुक्यात एकूण २४ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे तालुक्यात शेतशिवारात खरीप हंगामाची उत्सुकता लागली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. (Nandurbar Agriculture Preparation of season in Taloda taluka)

तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून खरीप पिकाचे क्षेत्र लागवडीयोग्य करून ठेवले आहे. यंदा तालुक्यात २४ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार असून, नऊ हजार ५०० हेक्टरहून जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे बागायती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड सुरूदेखील केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे लावून दोन-तीनदा पाणीदेखील भरले आहे. त्यामुळे कापूस पिकाची उगवणदेखील झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बागायती क्षेत्रावर कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना विजेचे वेळापत्रक पाहून पाणी द्यावे लागत आहे.

तालुक्यात त्या खालोखाल सर्वाधिक क्षेत्र ऊस पिकाचे राहणार आहे. मात्र, खरीप हंगामातील जिरायत कापूस, सोयाबीन, तूर, मका, करडई, तांदूळ, मूग, उडीद पिकांची पेरणी अजून झालेली नाही. त्यासाठी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

त्यासाठी बी-बियाणे व खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावीत, म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. तरीदेखील कपाशी पिकामध्ये काही कंपन्यांच्या बियाण्यांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे जात आहे.

शेतकरीदेखील ठराविक कंपनीच्याच कापूस बियाण्याची मागणी करीत असल्याचे दिसून येते. खताचेदेखील नियोजन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीदेखील यूरिया, डीएपी, १०:२६:२६ या खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

त्या वेळी दुकानदार शेतकऱ्यांना लिंकिंग करावयास सांगून इतर खतेदेखील खरेदी करावीत, असे सांगत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कृषी विभागाने नियोजन केल्याप्रमाणे खते उपलब्ध व्हावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ११३.१७ लाख पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातही शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा घेण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा घ्यावा म्हणून कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यात पावसाळापूर्व जनावरांचे लसीकरण करण्याचे कार्य प्रगतिपथावर असून, पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी सर्वच घटक कामाला लागले असून, पावसाची वाट पाहिली जात आहे. त्यातही कापूस व ऊस पिकांचे क्षेत्र सर्वाधिक राहत असल्याने इतर पिकांचेही नियोजन केले जात आहे. (latest marathi news)

"शेतकऱ्यांनी बी-बियाणे घेत असताना दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे. पक्के बिल घेतल्यास उगवण क्षमता नसलेल्या बियाण्यांच्या वेळी तक्रारींच्या पाठपुरावा करता येतो. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच खरीप पिकांची पेरणी करावी. तालुक्यात अजूनही उष्णतेचे वातावरण टिकून असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरवात करावी."- मीनाक्षी वळवी, तालुका कृषी अधिकारी, तळोदा

"खरीप हंगामात कपाशीची लागवड केली आहे. मात्र नियोजन केलेल्या कंपनीचे कापूस बियाणे बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे नाइलाजास्तव दुसऱ्या कंपनीचे बियाणे घेऊन कपाशीची लागवड पूर्ण केली आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे बियाणे पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी कृषी विभागाने लक्ष देण्याची अपेक्षा आहे." -अनिल सूर्यवंशी, शेतकरी, तळोदा

खरिपाची २०२४ नियोजनाची आकडेवारी

पीक क्षेत्र हेक्टरमध्ये

तांदूळ २२२

ज्वारी १,६६०

मका ७२५

तूर ४६१

मूग ५७

उडीद ५०

सोयाबीन २,७००

कापूस ९,६२३

ऊस ९,३७७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT