नंदुरबार : शहरातील एका इमारतीत क्रीडा क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (ता. ८) रात्री छापा टाकून पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू असून, सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. (sports club gambling police seized goods worth fifty seven lakhs )
शहरातील परदेशीपुरा परिसरातील नवीन पालिकेच्या मागील क्रीडा भवन क्लब येथे संदीप अरुण चौधरी ५२ पत्त्यांच्या विविध कॅटचा वापर करून २७ पत्ती नावाचा खेळ पैसे लावून खेळवत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणी मुख्य संशयित क्रीडा मंडळचालक संदीप चौधरी (रा. देसाईपुरा, नंदुरबार) याच्यासह ३७ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
त्यांच्यावर नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, दारू बाळगण्याचा परवाना नसतानाही क्रीडा मंडळात मद्यपान केल्याने परशुराम दशरथ पाडवी (रा. नारायणपूर) व इफ्तेखार शेख कासम पिंजारी (रा. एम. के. नगर, कोरीट नाका, नंदुरबार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून सहा लाख ७२ हजार दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.