No promotion esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 20 वर्ष सेवा करूनही पदोन्नतीपासून वंचितच! नंदुरबार जिल्ह्याच्या गट ब मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची खंत

सकाळ वृत्तसेवा

बोरद : नंदुरबार जिल्ह्यातील बीएएमएसधारक गट ब चे वैद्यकीय अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच अतिदुर्गम भागात व आदिवासी पाड्यांमध्येही प्रतिकूल परिस्थिती असताना आरोग्याची धुरा सांभाळत आहेत. गट अ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रभार सांभाळणारे नंदुरबार जिल्ह्यातील ५४ गट ब चे वैद्यकीय अधिकारी गेल्या वीस वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित आहेत. ते पात्र असूनही प्रशासन पदोन्नतीबाबत वारंवार दिरंगाई करीत आहे. (Nandurbar Deprived of promotion despite 20 years of service)

यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाने याबाबत माहिती मागविली जात आहे, परंतु पदोन्नती देणे टाळले जात आहे. त्यांना अद्यापही पदोन्नती दिली गेलेली नाही किंवा दिली जात नाही, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे. मात्र याचा काही एक उपयोग होताना दिसून येत नाही.

त्यामुळे वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ५४ गट ब वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने पदोन्नती द्यावी आणि यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी जातीने लक्ष घालावे, अशी विनंती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघ नंदुरबार जिल्ह्याने करण्यात येत आहे. (latest marathi news)

राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी तसेच नाशिक विभाग प्रमुख सध्या बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉ. अरुण लांडगे तसेच संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. मणिलाल शेल्टे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. दीपक पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. सुरेश देसाई, डॉ. पंकज कदम, डॉ. कुमोदिनी वळवी, डॉ. लालसिंग हुरेज, डॉ. प्रकाश पावरा, डॉ. अनिल पाटील यांनी केली आहे.

"गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्यातील विविध भागात प्रतिकूल परिस्थिती असतानाही सेवा देत आहोत. आमच्या कर्तव्यात आम्ही कुठलीही कसर ठेवली नाही. आम्ही रुग्णांना योग्य ती सेवा वेळोवेळी दिली आहे आणि यापुढे ही देणार आहोत. त्यामुळे शासनाने आमच्या बाबतीत पदोन्नतीचा योग्य तो विचार करावा व लवकरात लवकर पदोन्नती द्यावी."- डॉ. अरुण लांडगे, वैद्यकीय महासंघ नाशिक विभाग प्रमुख व बोरद प्राथमिक आरोग्य अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT