Heavy vehicles passing through the same road despite stopping the traffic by dropping sacks on the road. In the second photo, a tanker ignoring the no-entry sign at Prakash. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बंदी असूनही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक; डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील पूल जीर्ण

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : डामरखेडा (ता. शहादा) गावाजवळील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर असलेल्या गोमाई नदीवरील पूल जीर्ण झाला असून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेट्स लावून अवजड वाहनांची वाहतूक बंद केली आहे. तसे फलकही लावले आहेत. तरीही येथून सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. दुर्लक्षामुळे जीर्ण झालेल्या हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ( Despite ban heavy vehicle traffic is rampant )

जिल्हाधिकाऱ्यांनी व संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावलेले आहेत. मात्र ते कुचकामी असून राजरोसपणे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी प्रकाशा गावातील बस स्थानकाजवळ वैजालीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ बॅरिकेट्स लावून पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला आहेत.

केवळ छोटी चारचाकी वाहनांनाच पुलावरून जाण्यास परवानगी आहे. असे असतानाही सर्रासपणे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. पुलाजवळ लावलेल्या मातीच्या गोण्या बाजूला करून त्याच्यावरून अवजड वाहने जात आहेत. प्रकाशा गावाजवळ बॅरिकेट्स असताना शिवाय पोलिस कर्मचारी असताना अवजड वाहनांची सरळ वाहतूक सुरू आहे.(latest marathi news)

अवजड वाहनांची वाहतूक काथर्दे, भादे, पिंगाणे मार्गे शहादा शहरातील गोमाई नदी पुलावरून लोणखेडा मार्गे सरळ बायपासने वळवलेली आहे. काही वाहनांना काथर्दे मार्गे पाठवतात तर काही अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना गोमाई पुलावरून जाण्यास परवानगी देतात. त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

मोठ्या हानीची भीती

पुलाला साठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. बऱ्याच वेळा त्याची दुरुस्तीही झालेली आहे. मात्र आजच्या परिस्थितीत पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. केवळ लोखंडी पाइप लावून कठडे बनविण्यापेक्षा अद्ययावत बांधकामाचे कठडे करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत असून पूर्ण पुलाच्या दुरुस्तीची गरज व्यक्त होत आहे. या पुलाखाली गोमाई नदी पात्रात प्रकाशा बॅरेजचा पाण्याच्या फुगवटा कायम असतो. त्यामुळे अपघात झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT