Nandurbar News : शहरात नागरिकांना परवडणाऱ्या दरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्यासाठी पालिकेने नेमलेल्या खासगी एजन्सीने ऐन उन्हाळ्यात चार दिवसांपासून पाणीपुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील सर्वच स्तरांतील नागरिक त्या पाण्याचा वापर करून पाण्याची तहान भागवत होते. त्यात ‘पानी वाला आया, घरसे डिब्बा निकाल...’ गाणे वाजवून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत होते. (Nandurbar Displeasure of citizens due to summer water supply shutdown in Taloda)
मात्र बीओटी तत्त्वावर सुरू केलेला फिल्टर प्लांट परवडत नसल्याचे कारण देऊन एजन्सीने बंद केल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत. तळोदा पालिकेने शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून सुप्रकाश एंटरप्राइजेस या खासगी एजन्सीला बीओटी तत्त्वावर शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे काम दिले होते. मागील तीन-चार वर्षांपासून त्या खासगी एजन्सीची गाडी शहरात फिरून नागरिकांना पाणीवाटप करत होती.
अशी दोन वाहने एजन्सीकडे होती. शहरातील झोपडीधारक गरीब कुटुंब असू द्या अथवा हॉटेलचालक तसेच दुकानदार आणि शहरातील मध्यमवर्गीय वस्तीतील नागरिकदेखील त्या वाहनातून शुद्ध पाणी घेत असत. दहा रुपयांत १४ ते १८ लिटर व पाच रुपयांत सहा ते नऊ लिटर पाणी मिळत होते.
मात्र सुप्रकाश एंटरप्राइजेस या एजन्सीने मेंटेनन्स खर्च, डिझेल खर्च व इतर आनुषंगिक खर्च करून प्लांट परवडत नसल्याचे कारण देऊन प्लांट बंद करत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे चार दिवसांपासून पाणी मिळणे बंद झाले आहे. त्यात एजन्सीला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम पालिकेला मिळत होती. त्यासाठी पालिकेने एजन्सीला जागा व पाणी उपलब्ध करून दिले होते. (latest marathi news)
तीन-चार वर्षे परवडणाऱ्या खासगी एजन्सीने अचानक परवडत नसल्याचे कारण देऊन शुद्ध पाणीपुरवठा करणे बंद केल्याने शहरात नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे शहरात पालिकेचे शुद्ध पाणीपुरवठा केंद्र सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त असताना एजन्सीच्या माध्यमाने नागरिकांना सुविधा मिळत होती.
मात्र तीही बंद झाल्याने शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे किमान हातोडा तापी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येईपर्यंत पालिकेने पुन्हा नवीन एजन्सीची नेमणूक करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आहे तेच पाणी पिण्याची वेळ
शहरात संपूर्ण पाणीपुरवठा भूगर्भातील पाण्यावर कूपनलिकेच्या माध्यमातून होतो. कूपनलिकेतील ते पाणी शुद्ध करण्याची कोणतीही सोय पालिकेमार्फत उपलब्ध नाही. अशा वेळेला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या एजन्सीमुळे शुद्ध पाणी मिळण्याची आशा नागरिकांना होती. मात्र आता त्या एजन्सीनेही ऐन उन्हाळ्यात काम बंद केल्याने शहरातील नागरिकांना आहे तेच पाणी पिण्यावाचून पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.