Nandurbar News : नंदुरबार जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग व शेठ व्ही. के. शहा विद्यामंदिरातर्फे जिल्ह्यातील रस्तासुरक्षा अभियानाचा प्रारंभ मंगळवारी (ता. २३) मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
या वेळी शहरातील विविध भागांतून विद्यार्थ्यांनी रस्तासुरक्षा अभियानाबाबत घोषवाक्ये बोलून प्रचारफेरीद्वारे जनजागृती केली. (Nandurbar District Sub Regional Transport Department started road safety campaign news)
येथील (कै.) डॉ. विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुलातील शेठ व्ही. के. शहा विद्यामंदिर व (कै.) सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व त्यांच्यामार्फत कुटुंबातील लोकांनी रस्त्यावर वाहन कसे चालवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मनोज लोणारे, महाविद्यालयाचे प्राचार्य आय. डी. पटेल, उपप्राचार्य. एस. जे. पटेल, उपमुख्याध्यापक एस. आर. जाधव, पर्यवेक्षक सी. जी. पाटील, व्ही. डी. चौधरी, व्ही. ई. जावरे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक संकुलातील मुख्य प्रवेशद्वारापासून रस्तासुरक्षा अभियान प्रचारफेरीस प्रारंभ करण्यात आला. दोंडाईचा रोड, पंचायत समिती, महात्मा जोतिबा फुले चौक, बसस्थानक व जुने तहसील कार्यालय, पालिका, म्युनिसिपल हायस्कूल, एचडीएफसी बँकेमार्गे प्रचारफेरीचा समारोप शाळेत करण्यात आला.
मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी सांगितले, की मोटारसायकलपासून तर भलेमोठे ट्रक-ट्राला चालविताना नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यात ग्रामीण भागात अपघात संख्या वाढली आहे.
रस्तावरील अपघात हा कसा थांबवता येईल याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अभियान राबविण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथून अभियानास सुरवात करण्यात आली. रस्त्यावरील अपघातसंख्या कमी करण्यासाठी शालेय विद्यार्थी केंद्रबिंदू असून, त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील व्यक्ती वाहन चालवीत असेल तर त्यांना वाहन चालविण्याच्या नियमाची माहिती देत रस्त्यावरील अपघात कसे कमी होतील, असा उद्देश असल्याचे सांगितले.
"ग्रामीण भागात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. नियम न पाळता वाहन चालविल्यास अपघात होतात. कुटुंबातील कर्ती व्यक्ती गेल्यास त्याचे दुःख कुटुंबालाच कळते. वाहन चालविण्यासंदर्भात नियम कसे पाळावेत, याकरिता शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वाहन चालण्याचे नियम कळावेत हा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अभियानातील एक भाग आहे. सुरक्षित नागरिक-वाहनचालक कसा घडविता येईल असा यामागील उद्देश आहे." -अतुल चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक
"दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये वाहन अपघात प्रमाण वाढत चाललेले आहे. वाहन कसे चालवावे हे नियम चालकांना माहीत नाहीत किंवा नियमांचे पालन करत नाहीत. दुचाकीस्वार डोक्यावर हेल्मेट घालत नाही. वाहनचालकांचे अपघात होऊ नयेत किंवा नियम पाळावेत याकरिता विद्यार्थ्यांमार्फत कुटुंबातील वाहनचालकांना याबाबत माहिती मिळावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन नंदुरबार विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे." -प्राचार्य आय. डी. पटेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.