drink and drive police action esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: मद्यपी वाहनचालकांची पोलिसांनी उतरविली झिंग! एकाच दिवसात 31 जणांवर कारवाई; सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत मोहीम

Nandurbar News : गुरुवारी (ता. २४) दिवसभरात जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल ३१ मद्यपींवर कारवाई करीत पोलिसी खाक्या दाखविण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जिल्ह्यात तापमानाचा पारा बेचाळिशी ओलांडून सूर्य आग ओकू लागला आहे. अशा वातावरणात मद्यपी मात्र आपले झिंगाट वाहन चालवून मृत्यूला आमंत्रण देत आहेत. हे लक्षात येताच पोलिसांनी या झिंगलेल्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी (ता. २४) दिवसभरात जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल ३१ मद्यपींवर कारवाई करीत पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. (Nandurbar Drunken drivers been arrested by police news)

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कामगारापासून तर व्यापारी-व्यावसायिक, नोकरदार वर्गच नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच अल्पवयीन बालकेही दुचाकीच्या वापरात आघाडीवर आहेत. शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थी सायकलऐवजी आता मोटारसायकली सुसाट पळवू लागले आहेत.

त्यातच व्यसनाधीन वाहनचालक तर रस्त्यावर चालणाऱ्या इतर वाहनधारकांचा जाऊ द्या मात्र स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता दारू पिऊन सुसाट वाहने चालवितात. त्यातून मोटारसायकल अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजकाल नैसर्गिक मृत्यूपेक्षाही अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे.

शासन-प्रशासनाकडून अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहनधारकांचा सुरक्षित प्रवास व्हावा, घरी आपले कुटुंब वाट पाहत आहे, या उदात्त हेतूने वाहनचालकांमध्ये जाणीवजागृतीचे कार्य केले जाते. मात्र त्याकडे वाहनचालकांचे निव्वळ दुर्लक्ष होते. त्यामुळे अपघाताची मालिका दररोज सुरूच आहे.

अपघात टाळावेत म्हणून पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून मद्यपी, अल्पवयीन व विनापरवानाधारकांना अद्दल घडविली जाते. या कारवाईतून आतापर्यंत अनेकांचे वाहन परवाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र वाहनधारकांना कारवाईचे गांभीर्य दिसत नाही.

विशेष म्हणजे दुचाकी आता चारचाकी वाहनाचे कार्य करू लागली आहे. अनेक महाभाग एकाच दुचाकीवर दोन जणांना बसण्याची परवानगी असताना तब्बल चार-चार जण बसून भरधाव वेगाने वाहने चालविताना दिसतात. अनेकांकडे तर दुचाकी चालविण्याचे परवानेसुद्धा नाहीत.

मात्र मजुरीला जातो, वेळेवर वाहन मिळत नाही, आजारी रुग्ण आहे अशी कारणे दाखवून दुचाकीवर तीन जण तर हमखास बसून फिरतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीही हात टेकले आहेत. पोलिसांकडून कारवाई केली जाते मात्र ती नाममात्रच ठरते.

जिल्ह्यात पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी जिल्हाभर मद्यपी वाहनचालकांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. त्यात १२ पोलिस ठाण्यांतर्गत ३१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. (latest marathi news)

पोलिस ठाणेनिहाय कारवाई

पोलिस ठाणे कारवाई संख्या

नवापूर शहर -२

नंदुरबार तालुका- २

नंदुरबार उपनगर -२

नंदुरबार शहर-७

शहादा शहर -४

सारंगखेडा -२

धडगाव तालुका-२

तळोदा तालुका-२

अक्कलकुवा - २

मोलगी पोलिस ठाणे- २

विसरवाडी पोलिस ठाणे- २

म्हसावद परिसर - २

----------------------- एकूण - ३१

राजकीय हस्तक्षेप

वाहतूक शाखेने वाहनांचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली रे केली मग कोणी पुढाऱ्यांचा दम देतो, कोणी नगरसेवक, तर कोणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाचा वापर करत पोलिसांना दमबाजी करतात. ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ या म्हणीप्रमाणे नियम मोडून वाहन चालविणारे कायद्याचा धाक बाळगण्याऐवजी पोलिसांनाच नेत्यांचा धाक दाखवितात.

त्यामुळे पोलिसांकडून कारवाई झाली की नेत्यांचे फोन येतात. तेही केवळ मोटारसायकल सोडविण्यासाठी अशी स्थिती जिल्ह्यात आहे. नंदुरबार शहरात तर दोन वर्षांपूर्वी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या भावाने हाटदरवाजा परिसरात कारवाई करणाऱ्या पोलिसालाच कानात मारल्याची घटना सर्वश्रुत आहे. एवढी मजल वाढली आहे. त्यामुळे पोलिसही रिस्क घेण्यास धजावत नसल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT