तळोदा : नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीत शहादा विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये भाजप उमेदवाराला कॉग्रेस उमेदवारापेक्षा १४६४५ एवढे मताधिक्य जास्त मिळाले होते. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतांमधील हाच फरक केवळ १६७७ राहिला होता.
म्हणजेच शहादा विधानसभा मतदारसंघात खूप मोठा फरक मतांमध्ये नसल्याने १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत शहादा विधानसभा मतदारसंघ कोणाची पाठराखण करतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. (nandurbar election 2024 Shahada Vidhan Sabha Constituency)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री, शिरपूर या विधानसभा मतदारसंघांच्या समावेश होतो. या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.हिना गावित यांनी कॉग्रेस उमेदवार (स्व.) माणिकराव गावित यांच्याशी थेट लढत देतांना अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, साक्री व शिरपूर या पाच विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी घेतली होती.
तर २०१९ चा निवडणुकीत डॉ.हिना गावित भाजपकडून तर ॲड. के. सी.पाडवी कॉग्रेसकडून लढतांना शहादा, नंदुरबार व शिरपूर या तीन विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आघाडीवर होते. दुसरीकडे २०१४ चा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार (स्व.)माणिकराव गावित केवळ नवापूर मतदार संघात आघाडीवर होते.
मात्र २०१९ चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार ॲड. के. सी.पाडवी हे अक्कलकुवा, नवापूर व साक्री या विधानसभा क्षेत्रात आघाडीवर राहिले होते. त्यामुळे यावेळी कोणत्या मतदारसंघात भाजप उमेदवार व काँग्रेस उमेदवार आघाडी घेतात याकडे लक्ष लागून आहे.
भाजपकडून डॉ. हिना गावित याच तिसऱ्यांदा नशीब आजमावत असून त्यांना हॅटट्रिक करण्याची संधी आहे तर कॉग्रेसकडूनही ॲड.गोवाल पाडवी यांच्यारूपाने उच्चशिक्षित तरुण रिंगणात आहे. त्यामुळे कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोण आघाडी घेणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी नंदुरबार व शिरपूर या दोनच विधानसभा मतदारसंघांनी निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्यामुळे दोन्ही वेळा डॉ. हिना गावित यांच्या विजय सुकर झाला होता. त्यात २०२४ चा निवडणुकीत प्रचाराची रणनीती कशी असते , काँग्रेस व भाजप उमेदवारांना कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी घेता येते यावर देखील निकाल अवलंबून राहणार आहे. त्यात विधानसभेचा शहादा मतदारसंघ कोणाला आपला कौल देतो याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. (Nandurbar Political News)
मागील काळात शहादा मतदारसंघात बरीच उलथापालथ झाली आहे.कॉग्रेस पक्षात असलेले माजी मंत्री पद्माकर वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी आता भाजपत आले आहेत. दुसरीकडे शहाद्यात दीपक पाटील देखील भाजपतच आहेत. त्यामुळे भाजपची मतदारसंघात ताकद वाढली आहे. दुसरीकडे आता कॉग्रेसलाही मतदार टिकविण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.
२०१४ निवडणूकीत विधानसभानिहाय मिळवलेले मताधिक्य
विधानसभा माणिकराव गावित डॉ हिना गावित
अक्कलकुवा -- ३८९१
शहादा -- १४६४५
नंदुरबार -- ५००५५
नवापूर १२९१८ --
साक्री -- १७४७
शिरपूर -- ४९१०३
२०१९ निवडणूकीत विधानसभानिहाय मिळवलेले मताधिक्य
विधानसभा ऍड.के.सी. पाडवी डॉ हिना गावित
अक्कलकुवा १५९ --
शहादा -- १६७७
नंदुरबार -- ७०२८२
नवापूर ७३३३ --
साक्री ९८७७ --
शिरपूर -- ४०७०६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.