Prime Minister Narendra Modi, Priyanka Gandhi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabah Constituency : कॉर्नर सभांमधून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Lok Sabah Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणुक अंतिम टप्यात आली आहे. आतापर्यंत मोठ्या नेत्यांचा सभा झाल्या नसल्या तरी त्या पुढील दोन-चार दिवसात होणार आहेत. ते नेते काय आरोप-प्रत्यारोप करतात, त्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मात्र तत्त्पूर्वी सध्या भाजप महायुती व कॉग्रेस महाविकास आघाडीच्या स्थानिक राजकीय नेत्यांकडून आपण कसे चांगले व आपल्या पक्षाने जनकल्याणाचे काय काम केले हे ठासून सांगत कॉर्नर सभांमधून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. (election of Lok Sabha Constituency has reached its final stage )

नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. केवळ सहा दिवस मतदानासाठी उरले आहेत. त्यात ११ मेस प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. म्हणजेच चार दिवस प्रचारासाठी हातात उरले आहेत. पहिल्या टप्यात भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी व कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी तसेच त्यांच्या नेते -कार्यकर्त्यांनी गाव भेटीद्वारे प्रचाराला प्रारंभ केला होता.

दोन्ही पक्षाने नंदुरबार मतदारसंघातील उमेदवारांची नावे लवकर घोषित केल्याने दोन्ही उमेदवारांना प्रचाराला चांगला वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग करीत गावभेटी, कार्यकर्ता मेळावा, पक्षीय मेळावा यातून आपला उमेदवार व आपल्या पक्षाचा अजेंडा समोर ठेवत प्रचारात रंग भरला होता. प्रचार अंतिम टप्यात आला आहे. प्रचारासाठी प्रादेशिक किंवा राष्ट्रीय नेते कोणीही अद्याप मतदारसंघात प्रचारासाठी आले नाहीत.

मात्र भाजपतर्फे मंत्री डॉ. विजयकुमार गावित, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उमेदवार डॉ. हिना गावित, जि.प. अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, तळोद्याचे आमदार राजेश पाडवी, नवापूरला भरत गावित, माजी आमदार शरद गावित, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष भरत माळी, नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, डॉ.कांतीलाल टाटीया, आमदार आमशा पाडवी, शहाद्याचे दीपक पाटील, नंदुरबारमध्ये डॉ.विक्रांत मोरे आदी कंबर कसून प्रचाराला लागले आहेत. ( latest political news )

ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेत आहेत. तसेच महाविकास आघाडीतर्फे माजी मंत्री ॲड. के. सी.पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, दिलीप नाईक, प्रतिभा शिंदे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते जुने-नवे कार्यकर्ते जोडत प्रचार करीत आहेत. निवडणुक रिंगणात प्रत्यक्षात ११ उमेदवार आहेत. मात्र खरी लढत भाजपचे डॉ. हिना गावित व कॉग्रेसचे महाविकास आघाडीचे ॲड. गोवाल पाडवी यांच्यात रंगली आहे.

त्यामुळे इतर उमेदवारांचा कोणाला सुगावाही नाही. प्रत्यक्षात दोनच उमेदवार आमने-सामने लढत असल्याचे चित्र आहे. महायुतीकडून मोदी सरकार व राज्य सरकारने केलेली विकास कामे हे प्रभावी मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले आहेत. मोदी सरकारने घेतलेले निर्णय , जनकल्याणकारी योजना, महिलांसाठी योजना, पाणी पुरवठा व घरकुल योजना प्रभावी मांडत ‘मोदी की गॅरंटी’ देत आहेत.

कॉंग्रेसने संविधान बदलण्याचे भाजपचे कट कारस्थान, आरक्षण रद्द करण्याचा डाव, डी लिस्टींग, मणिपूर प्रकरण यासह जिल्ह्यातील रखडलेला विकास, सिंचन प्रकल्पांचे रखडलेले काम, स्थलांतर, एमआयडीसी, रोजगार व आरोग्य-शिक्षणाचे प्रलंबित प्रश्‍न प्रभावीपणे मांडले जात आहेत. यातूनच दोन्ही उमेदवारांना राजकीय वारसा असल्याने कोणाच्या कुटुंबाने आतापर्यंत काय चांगले अन् काय वाईट केले,यावर प्रकाशझोत टाकला जात आहे. त्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

सोशल मिडीयावर भर

दोन्ही पक्षाचा उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मिडिया टीम कार्यरत केली आहे. विविध क्लृप्त्यांचा वापर करीत उमेदवारांचा प्रभाव, काय करणार, काय केले नाही, यश-अपयश मांडत आपला उमेदवार कसा चांगला व पुढे काय करणार आहे. एकमेकांचे उणे -दुणे काढणारी चित्रफित बनवून त्या सोशल मिडीयावर प्रसारीत करीत प्रचाराला वेग दिला आहे.

मोदी-प्रियंका यांच्या सभेचे आकर्षण

कॉग्रेसर्फे प्रियंका गांधी यांची सभा ९ मे रोजी सकाळी नऊला छत्रपती हटस्पिटल शेजारील पटांगणावर आयोजित केली आहे. तर भाजपने ही १० मे रोजी सकाळी साडेनऊला धुळे रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्राजवळील पटांगणावर म्हणजेच २०१९ मध्ये ज्या ठिकाणी सभा झाली होती, तेथेच सभा होणार आहे. दोन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सभा अंतिम टप्यात असल्याने कोण काय बोलतो, काय आरोप करतात, शेतकरी, बेरोजगारी, स्थलांतर, शिक्षण यासह स्थानिक कोणत्या मुद्यांवर बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT