Ramdan Eid (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Ramdan Eid 2024 : रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत उत्साह; ईदनिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात, सीसीटीव्हीचीही करडी नजर

Nandurbar News : रमजान महिन्याचा समारोप गुरुवारी (ता. ११) ईदचा चांद पाहून होणार आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी विविध खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : रमजान महिन्याचा समारोप गुरुवारी (ता. ११) ईदचा चांद पाहून होणार आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी विविध खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठेत ईदचा खरेदीचा उत्साह दिसून आला. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला रमजान महिन्याचा उद्या समारोप होत आहे. म्हणजेच, उद्या ईदचा चांदचे दर्शन घेऊन मुस्लिमबांधव आपल्या महिनाभराचा रोजा उपवासाची सांगता करणार आहेत.

त्यामुळे नवीन कपडे, घरात समाज संस्कृतीनुसार बनविला जाणारा शिरखुर्मा व त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करताना आज मुस्लिमबांधव दिसून आले. नंदुरबार हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसून आली. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह होता.

दरम्यान, सकाळी नऊला येथील माळीवाडा परिसरातील ईद मैदानावर ईदची नमाजपठण होणार आहे. त्यानंतर तेथे राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सज्ज राहणार आहेत. (latest marathi news)

त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांतर्फेही ईद शांततेत पार पडावी, नागरिकांना ईदचा आनंद घेता यावा म्हणून शहरासह मुख्य चौक व रस्त्यांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील मुख्य भागात सीसीटीव्हीचीही करडी नजर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT