Amol Patil, Deputy Sarpanch representative of Pingane talking to MP Gowal Padvi regarding the electricity problem of the village. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : अखेर चोवीस तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत; वीज वितरण अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांचे प्रयत्न

Nandurbar News : वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व विविध गावांतील ग्रामस्थ यांच्या मेहनतीने तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

शहादा : तालुक्यातील सुमारे दहा ते बारा गावांमध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व विविध गावांतील ग्रामस्थ यांच्या मेहनतीने तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. (after 24 hours power supply smooth in nandurbar)

तालुक्यात रविवारी रात्री अकराच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात होते. शिवाय वीज पुरवठा खंडित झालेल्या त्या गावांच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

तालुक्यातील पिंगाणे,भादे, कलसाडी, काथर्दे,वाघोदे, सिनावल,परिवर्धा,तऱ्हाडी, कोठली, जावदे, वाडी वेळावद पुनर्वसन, ठेंगचे,सोनवल आदी गावांमध्ये गेल्या २४ तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यांना शहादा फीडवरून वीजपुरवठा केला जातो. पाऊस सुरू झाल्यापासून बत्तीगुल असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

सुमारे १२ ते १३ गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. शेतशिवारातही वीज नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल झाले. अखेर त्या विविध गावांतील ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत शेतशिवारात फेरफटका मारून नेमकी वीज कुठून खंडित झाली आहे याचा शोध घेतला व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना मदत केल्याने तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. (latest marathi news)

खासदार गोवाल पाडवींकडून दखल

तालुक्यातील परिवर्धा येथील सबस्टेशनला शहादा येथून वीजपुरवठा होतो व परिवर्धा सबस्टेशनमधून पिंगाणे गावात वीजपुरवठा होतो. पिंगाणे व परिवर्धा गावादरम्यान अंतर जास्त आहे. त्याऐवजी पिंगाणे गावापासून काही अंतरावर तिखोरा फीडर आहे.

तिखोरा फीडरलाही शहादा येथून वीजपुरवठा होत असल्याने पिंगाणे येथील ग्रामस्थांनी खासदार गोवाल पाडवी यांची भेट घेऊन विजेच्या समस्येबाबत अडचण सांगून आम्हाला तिखोरा फीडरवरून वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी केली. याची दखल घेऊन तत्काळ वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खासदार पाडवी यांनी संपर्क साधून पिंगाणे ग्रामस्थांना तिखोरा येथून वीजपुरवठा करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT