IAS officer Anjali Sharma was personally present while sealing the shop. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोदा पालिकेत प्रथमच आयएएस दर्जाचे अधिकारी; कामाचा धडाका सुरू

Nandurbar : खानदेशातील सर्वांत जुन्या पालिकेला प्रथमच आयएएस दर्जाचे अधिकारी मुख्याधिकारी म्हणून मिळाल्याने शहरात एकच चर्चा होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : येथील पालिकेत पहिल्यांदाच मुख्याधिकारी म्हणून आयएएस दर्जाचे अधिकारी लाभले असून, पदभार स्वीकारल्याबरोबर त्यांनी शहरातील सुमारे ६२ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या असून, तीन दुकानांना सील करण्यात आले. दुसरीकडे खानदेशातील सर्वांत जुन्या पालिकेला प्रथमच आयएएस दर्जाचे अधिकारी मुख्याधिकारी म्हणून मिळाल्याने शहरात एकच चर्चा होत आहे. (Nandurbar First time IAS rank officer in Taloda Municipality Work)

त्यात परिवीक्षाधीन कालावधी म्हणून पदभार देण्यात आल्याची शक्यता असल्याने कामाचा सुरू केलेला धडाका किती दिवस चालतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी पदभार स्वीकारून दोनच महिने झाले असताना त्यांच्या जागी अंजली शर्मा या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ४ मार्चल मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

त्या आयएएस दर्जाच्या अधिकारी असताना परिवीक्षाधीन कालावधी म्हणून त्यांना हा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी त्यामुळे पहिल्यांदाच तळोदा पालिकेला आयएएस दर्जाचे अधिकारी मुख्याधिकारी म्हणून मिळाले आहेत. दुसरीकडे श्रीमती शर्मा यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला असून, बुधवारी सुमारे ६२ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

थकबाकीदार मालमत्ताधारकांना व पालिकेच्या व्यापारी गाळ्यात दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनादेखील नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यात पालिकेच्या व्यापारी गाळ्यातील तीन व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत.

दुकाने सील करण्याची कारवाई स्वतः श्रीमती शर्मा यांनी उपस्थित राहून केली. या वेळी मिळकत विभागाचे मोहन सूर्यवंशी व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे पालिकेचा कर थकविलेल्या व भाडे थकविलेल्या थकबाकीदार व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (latest marathi news)

त्यात ६२ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याने शहरातील अतिक्रमणधारकांचेही धाबे दणाणले आहे. त्यामुळे आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेला कामाच्या धडाका असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सुज्ञ नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

शहरवासीयांचे लक्ष

पालिकेच्या माध्यमातून सध्या कोट्यवधींची हातोडा तापी पाणीपुरवठा योजना व शहर विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या योग्य त्या अंमलबजावणीसाठी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची देखरेख आता असणार आहे.

त्यात पाणीपुरवठा व रस्ते यांसारखी मूलभूत कामे सुरू असताना पालिकेला आयएएस दर्जाचे अधिकारी मिळाल्याने शहरात स्वागत होत आहे. त्यात परिवीक्षाधीन कालावधी असल्याने किती काळ त्यांना मिळतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT