The bridge over Tapi collapsed on the side of the barrage on Sunday afternoon. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Flood News: तापीला महापूर, पुलाला भगदाड! टाकरखेडाकडील भरावही वाहून गेला; वाहतूकही थांबविली

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Flood News : सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीवर असलेल्या पुलाला टाकरखेडा गावाच्या दिशेने रविवारी (ता. १७) दुपारी भगदाड पडले असून, टाकरखेडाकडील भरावही वाहून गेल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे.

दोन्ही बाजूंकडील वाहतूक थांबविण्यात आली. सोळाचाकी ट्रेलर जात असताना ही घटना घडली. दुसरीकडे तापीला महापूर आला असल्याने अनेकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती, ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले.

पोलिस यंत्रणा उशिरा पोहोचल्याने टाकरखेडा येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुलावरील वाहतूक थांबवली.

दरम्यान, टाकरखेड्याच्या दिशेने पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी व मोटारसायकलस्वारांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून ब्यारेजच्या छोट्या पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे. (Nandurbar Flood News tapi river flood bridge damaged embankment from Takarkheda also washed away Traffic also stopped)

येथील तापी नदीच्या पुलाला रविवारी दुपारी दोनच्या सुमारास पुलावरून एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर पुलावरील एका खड्ड्यात रुतल्यावर टाकरखेडा गावाच्या दिशेने पुलाला मोठे भगदाड पडले.

या वेळी सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्याने वाहन तिथून निघाले. परंतु, ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले. घटनेला तब्बल दोन तास होऊनही कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले नव्हते.

दुपारी साडेचारला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल स्वतः सारंगखेडा पुलाजवळ थांबून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत होते. पुलावर भगदाड पडल्याची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

रविवार हा सारंगखेडा येथील आठवडे बाजार असल्याने टाकरखेडा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी येत असतात. पुलावरून वाहतूक बंद केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना...

हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने तापी दुथडी भरून वाहत आहे. तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, महापूर आल्याने काही गावे पाण्याच्या विळख्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तापी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. सारंगखेडा व प्रकाशा येथील दोन्ही बॅरेजचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात पूर्णतः गारवा निर्माण झाला असून, सूर्याचे दर्शन नाही.

काठावरील गावांना इशारा

सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.

यामुळे शहाद्याहून धुळे, नाशिक, मालेगावकडे जाणारी तसेच या भागातून शहादा, धडगाव, तळोद्याकडे येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले असून, प्रति सेकंद दोन लाख ४३ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे, यामुळे तापीला महापूर आलेला आहे.

तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. नदीकिनारी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT