नवापूर : फेब्रुवारी ते मार्चमध्ये दहावी व बारावीची परीक्षा संपली. आता मेच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीचा, तर मेअखेर दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे परीक्षा विभागाच्या सचिवांनी जाहीर केले आहे. सीबीएससी बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर झाला. पुढील शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक दाखले मेमध्ये काढून ठेवले, तर ऐनवेळी धावपळ होणार नाही, असे शैक्षणिक विभाग, तहसीलदार, शाळांतर्फे सांगण्यात आले. (Nandurbar educational certificates marathi news)
आपल्याला आयुष्यात कोणते ध्येय साध्य करायचे आहे, कोणते शिक्षण घ्यावे लागेल याचे नियोजन विद्यार्थ्यांसह पालक करत असतात. नवीन शैक्षणिक वर्षापासून अर्थात जूनपासूनच दहावी-बारावीनंतरच्या शिक्षणाची चिंता पालकांना असते. त्यासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालक जूनमध्ये धावपळ करतात.
वास्तविक एप्रिल, मेमध्ये सुटीच्या कालावधीत आवश्यक दाखले काढून घेण्याची संधी पालकांना असते. मात्र दहावी-बारावी निकाल लागल्यानंतर जूनमध्ये प्रवेश सुरू झाल्यानंतरच दाखल्यासाठी रांगा लागतात. विविध प्रकारचे दाखले लवकर हवे असतात, मात्र गर्दीमुळे दाखले मिळण्यास उशीर होतो.
आवश्यक दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती घेण्याकडे बहुतांश पालकांचे दुर्लक्ष होते. पाल्याची शिक्षणाची दिशा आधीच ठरली असेल, तर संबंधित कोर्सच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांची उपलब्धता करून ठेवली तर ऐनवेळी धावपळ होत नाही.
जूनमध्ये एकदम गर्दी वाढल्याने दाखले वेळेत मिळणे जिकिरीचे होते. दाखला काढण्यासाठी भरपूर कागदपत्रे जोडावी लागतात. त्यामध्ये जातीचा दाखला, डोंगरी दाखला, नॅशनॅलिटी दाखला काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. यामुळे असे दाखले वेळेत मिळण्यासाठी आतापासूनच नियोजन गरजेचे आहे.
दाखले लवकर मिळत नसल्यास पुन्हा यंत्रणेलाच दोष दिला जातो. त्यामुळेच सुटीमध्ये दाखले काढून घेण्यासाठी पालकांनी सजग राहण्याची गरज आहे. खरं तर एप्रिलपासूनच विविध दाखले काढून ठेवण्याची मानसिकता विद्यार्थी व पालकांनी करण्याची गरज आहे. (latest marathi news)
आवश्यक दाखले :
दहावी-बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी अधिवास, तहसील उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, आरक्षण नसलेल्या जातीसाठी ईडब्ल्यूएस, कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसी, कुणबी नोंद नसणाऱ्यासाठी नव्याने एसईबीसी दाखला, अल्पभूधारक दाखला आदी दाखल्यांची आवश्यकता असते. हे काम आतापासूनच सुरू केल्यास पालकांची धावपळ कमी होईल.
"'सर्वच शैक्षणिक संस्थांची प्रवेशप्रक्रिया साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. त्यामुळे दाखल्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. साहजिकच सर्व्हरवर ताण येऊन प्रक्रियेस विलंब लागू शकतो. म्हणून पालकांनी एप्रिल व मेमध्येच दाखले काढावेत."
-संदीप दुसाने, माउली कॉम्प्युटर, सेतू केंद्र, नवापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.