Nandurbar News : जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
शहरातील टोकरतलाव रोड येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेत सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यपाल रमेश बैस यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार. (Government Medical College and Hospital which has become milestone in health sector)
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील, तर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, वैद्यकीय शिक्षण व आयुषचे आयुक्त राजीव निवतकर, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे उपस्थित होते.
नंदुरबारला मेडिकल हब उभे करणार ः खासदार डॉ. गावित
आमचे स्वप्न फक्त एमबीबीएसच्या ॲडमिशन किंवा बॅचेसपर्यंत सीमित नाही. तर आम्हाला हे मेडिकल हब या ठिकाणी तयार करायचे आहे. भविष्यात पोस्ट ग्रॅज्युएशनचे आम्हाला या ठिकाणी विद्यार्थी आणायचेत आणि तेवढेच नाही तर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा आमच्या नंदुरबारच्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाले पाहिजे.
यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा तसेच २३ कोटी रुपये खर्चाच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा सोहळा व गव्हाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
‘एम्स’च्या धर्तीवर पहिले महिला रुग्णालय बनणार
खासदार डॉ. गावित म्हणाल्या, की नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्याच्या सुविधा कशा बऱ्या करता येतील आणि नंदुरबारला चांगले इन्फ्रास्ट्रक्चर कसे देता येईल यासाठी नेहमीच माझा प्रयत्न असतो. क्रिटिकल केअर ब्लॉक हे आपले सरकार देत आहे हे जेव्हा मला कळाले तेव्हा मी लगेच माझे पत्र केंद्र सरकारला दिले आणि माझ्याच पत्रावर नंदुरबारचे २३ कोटी रुपयांचे क्रिटिकल केअर ब्लॉकसुद्धा मंजूर झाले. (latest marathi news)
मागच्या वर्षी नंदुरबारला आपण एमसीएची विंग मंजूर करून घेतली. १०० खाटांचे महिला रुग्णालय या ठिकाणी आपण ‘एम्स’च्या धर्तीवर तयार करत आहोत. ज्या ठिकाणी ११ लेबर रूम आहे, असे महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेच नसेल तसे हॉस्पिटल आपण नंदुरबारला करत आहोत.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, की वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणे ही मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची तळमळ आणि स्वप्न होते. ते आज पूर्णत्वास आल्याचे पाहून आनंद वाटतो.
नंदुरबार आणि अन्य आदिवासी जिल्ह्यात खूप आरोग्याचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी मेडिकल कॉलेज किती महत्त्वाचे असते याचे महत्त्व मंत्री डॉ. गावित यांना माहीत होते. १९९५ पासून २०१३ पर्यंत मेडिकल कॉलेजसाठी खूप प्रयत्न केले.
दृष्टिक्षेपात वैद्यकीय महाविद्यालय
-नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर खर्च (केंद्र प्रायोजित वैद्यकीय महाविद्यालय-Phase III) ३२५ कोटी रुपये आहे. त्यांपैकी १९५ कोटी (६० टक्के) केंद्र सरकारचा वाटा आहे आणि १३० कोटी (४० टक्के) राज्य सरकारचा वाटा आहे. ५०० खाटा आणि १०० एमबीबीएस प्रवेशक्षमतेच्या या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाची एकूण प्रशासकीय मान्यता ५८५.४७ कोटी रुपये एवढी आहे.
नवीन इमारतीची ४६ एकर जागा मौजा टोकरतलाव, नंदुरबार येथे प्रस्तावित केली आहे. ५०० खाटांच्या क्षमतेसह या रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा, रक्तपेढी, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, डायलिसिस, मोठ्या आणि लहान शस्त्रक्रियांसाठी ऑपरेशन थिएटर यांसारख्या विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
एमबीबीएसच्या पहिल्या बॅचची सुरवात २०२० मध्ये झाली. महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १०० एमबीबीएस विद्यार्थी असून, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या चार बॅचेस (४०० विद्यार्थी) शिकत आहेत.
पहिली बॅच अंतिम एमबीबीएस पास होऊन मे २०२५ पासून त्यांची इंटर्नशिप सुरू होईल. राज्य वैद्यकीय विद्यापीठात आजपर्यंत एमबीबीएसचा सरासरी उत्तीर्ण दर सुमारे ९२ टक्के आहे. डीएनबी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाच प्रमुख विषयांमध्ये या महाविद्यालयाचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, लवकर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.