Nandurbar News : क्षमतेपेक्षा जास्तीची अवजड वाहनांची वाहतूक झाल्याने तिखोरा गावाजवळील गोमाई नदीवरील पुलाला तडे पडले असल्याने तो कुमकुवत झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने वाहतूक कुकरमुंडा- नंदुरबार अन दोंडाईचामार्गे वळविली आहे. त्याबाबत सूचना फलकही लावण्यात आला. सर्वच अवजड वाहनांची वाहतूक गुरुवार (ता. १)पासून बंद करण्यात आली आहे. तथापि, याबाबत पुरेशी दक्षता न घेतली गेल्याने गुरुवारीही या पुलावरून अवजड वाहतूक सर्रास सुरू होती. (nandurbar Heavy traffic over weak bridge)
जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी त्या संदर्भात आदेश दिले आहेत. खेतिया, शिरपूर आणि धुळ्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली. प्रकाशाकडून शहाद्याकडे येणाऱ्या लहान वाहनांची वाहतूक प्रकाशा, काथर्दे, कलसाडी, पिंगाणे पुलावरून कुकडेलमार्गे शहादा करण्यात आली आहे.
तरीही गुरुवारी दिवसभर या पुलावरून अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरूच होती. शहादा- प्रकाशा रस्त्यावरील डामरखेडा (ता. शहादा) गावाजवळील पुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्याची वाहतूकही १ मार्चपासून तिखोरा पुलावरून शहादा, लोणखेडामार्गे वळविण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तांत्रिक पाहणी केली. सद्यस्थितीत पुलाचे ॲप्रॉन वाहून गेले आहे. (latest marathi news)
पुलाची दुरुस्ती होईपर्यंत पुलावरील वाहतूक वळविण्याबाबतची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती. सार्वजनिक हित लक्षात घेऊन गुरुवार (ता. १)पासून ते पुढील आदेश होईपर्यंत गोमाई नदीपुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करून पर्यायी मार्गही उपलब्ध करून दिला आहे. तरीही वाहतूक सर्रास सुरू आहे.
ना फलक, ना बॅरिकेट्स...
या मार्गावर नंदुरबारचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नाशिक येथील राज्य महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्त यंत्रणेमार्फत दिशादर्शक फलक आणि बॅरिकेटर्स लावण्यात येऊन वाहतूक वळविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पथक नियुक्त करण्यात यावे, असे नमूद करूनही अवजड वाहनांची वाहतूक सर्रास सुरू असल्याने काही दुर्घटना घालण्यात नेमके जबाबदार कोण, याबाबत जनमानसात प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहतूक कुठून वळवावी?
अवजड वाहनांची वाहतूक कुकुरमुंडामार्गे वळविण्यात आलेली असली, तरी या फाट्यावर तशी उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे अक्कलकुव्याकडून येणारी वाहने तळोद्यामार्गे शहाद्याकडे सर्रास येत आहेत. यात अनेक परराज्यांतील वाहनचालक असतात. त्यांना हा फलक समजत नाही, त्यामुळे कुकुरमुंडा फाट्यावर प्रथम पोलिसांचे पथक नेमण्याची गरज आहे. त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.