Water Jar esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Water Scarcity: टंचाईमुळे फिल्टर पाण्याच्या जार विक्रीत वाढ! सर्दीसह घशाच्या आजारांना निमंत्रण; केमिकलचा परिणाम

Water Scarcity : शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी वर्षभर पुरेल एवढे पिण्याच्या पाण्याबाबत केलेल्या नियोजनामुळे आजही शेवटच्या टप्प्यात शहरवासीयांना कमी-अधिक प्रमाणात पाणी मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Water Scarcity : सध्या शहराला होणारा विरचक धरणातील पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शहरावर शेवटच्या टप्प्यात पाणीबाणीचे संकट येऊ लागले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी वर्षभर पुरेल एवढे पिण्याच्या पाण्याबाबत केलेल्या नियोजनामुळे आजही शेवटच्या टप्प्यात शहरवासीयांना कमी-अधिक प्रमाणात पाणी मिळत आहे.

मात्र अनेक कुटुंबांना तेवढे पाणी पुरत नाही, तर काहींना पुरेसे पाणी मिळत नाही. पिण्याचा पाण्यासाठी फिल्टर पाण्याचे जार विकत घेत आहेत. त्यामुळे पाणी विक्रीचा व्यवस्या तेजीत आला आहे. त्यामुळे विक्रेत्यांचाही भाव वाढला आहे. (Nandurbar increase in sales of filtered water jars)

‘जल है तो कल है’ असे ब्रीदवाक्य आहे. त्याची प्रचीती आता शहरवासीयांना येत आहे. तीव्र उन्हाळा सुरू आहे. मात्र तरीही शहरवासीयांना पिण्याची पाणीटंचाई भासू नये, म्हणून आतापर्यंत शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी स्वतः लक्ष घालत होते.

त्यांच्या नियोजनामुळे व नागरिकांच्या सहकार्यातून वर्षभर पुरेल एवढ्या पिण्याच्या पाण्याचे त्यांचे सूक्ष्म नियोजन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आजपावेतो शहराला मुबलक पाणी मिळत आहे. मात्र यंदा पावसाळा कमी झाल्याने विरचक धरणात पाणीसाठा कमी झाला.

तरीही शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून आंबेबारा धरणातून पालिका प्रशासनाने पाणी आणले. ते आतापावेतो पुरत आहे. मात्र साठा कमी झाल्याने पाच दिवसांआड पाणी सोडले जात आहे. त्याची वेळ कमी केली गेली आहे. त्याच्यामागचा हेतू म्हणजे थोडे का असेना शहरातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावे, असा आहे. (latest marathi news)

फिल्टर पाणी जार विक्री जोरात

पालिकेतर्फे शहरातील काही भागात वॉटर एटीएम मशिन बसवून पिण्यासाठी पाण्याची सोय पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ शहर व लगतच्या वसाहतीतील जनतेला होत आहे. त्यासोबतच खासगी फिल्टर पाण्याचे जार विकणाऱ्यांचीही तेजी झाली आहे.

२० रुपयांप्रमाणे जार विक्री करीत आहेत. तोही मिळावा म्हणून खूपच विनवण्या करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्या पाण्यामुळे मात्र नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र पाणी मिळत नाही म्हणून मजबुरीने नागरिक खासगी जारचे पाणी घेऊन वेळ निभावत आहेत.

मात्र विक्रेत्यांनीही नागरिकांच्या जिवाशी खेळू नये, पाणी थंड करण्यासाठी त्यात केमिकलचा वापर करीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पाणी थंडगार मिळत असले तरी त्या पाण्यामुळे सर्दी, ताप, घशाच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये जारचे पाणी प्यायल्याने असा त्रास होत असल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT