धडगाव : तालुक्यातील दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे अनेक ऑनलाइन कामांना खोळंबा निर्माण होतो. अशातच दुर्गम भागातील तिनसमाळ गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी थेट एका उंच टेकडीवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावे लागत आहेत. (Initiative of boys for Ladki Bahin Yojana Due to lack of network)
तिनसमाळ येथे दुर्गम भाग पाहता स्थानिक संस्था जय जोहार फाउंडेशन व उमेदकडून एकदिवसीय शिबिर ठेवण्यात आले होते. नेटवर्कची सोय पाहता एका टेकडीवर गुजरातमधील रोमिंग नेटवर्क मिळते. त्या ठिकाणी जाऊन सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून ऑनलाइन फॉर्म भरले जातात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी नारीशक्तीदूत ॲप्सचा वापर करून फॉर्म भरले. वेबसाइट लोड घेत असल्यामुळे तासन् तास वाट पाहत बसावी लागते. त्यामुळे अशिक्षित आदिवासी महिलांची कागदपत्रे एकत्र करून त्यांना ऑफलाइन फॉर्म भरून पुन्हा ऑनलाइन भरण्यासाठी बचतगटाच्या अध्यक्षा मनीषा लक्ष्मण पावरा मदत करत होत्या. (latest marathi news)
ऑनलाइन फॉर्म लक्ष्मण मोगरा पावरा यांनी मोबाईलवर भरले. पाड्यातच फॉर्म भरण्याची सोय केल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या वेळी शिबिर आयोजन करण्यासाठी व ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी जय जोहार फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण मोगरा पावरा यांनी प्रयत्न केले, तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उमेद बचतगटाच्या अध्यक्षा मनीषा पावरा यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्विसाठी लालदास पावरा, कल्पना पावरा, बचतगटाच्या महिला आदींनी प्रयत्न केले.
"तालुक्याला जाण्यापेक्षा पाड्यातच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सोय केल्यामुळे आमचा त्रास कमी झाला व वेळ वाचला. त्यामुळे खूप समाधान झाले."
- वांगीबाई नटवर पावरा, ग्रामस्थ महिला
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गावातील महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून बचतगटाच्या महिलांना सोबत घेऊन शिबिर आयोजन केले व शिबिर यशस्वी झाले."
- लक्ष्मण मोगरा पावरा, अध्यक्ष, जय जोहार फाउंडेशन, तिनसमाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.