नवापूर : येथील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर बुधवारी (ता. २४) रात्री नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. वारे आपल्या शासकीय निवासस्थानी असताना लाचेची रक्कम घेताना त्यांना पकडले होते. गुरुवारी (ता. २५) सकाळपासूनच नवापूर व नाशिक येथील वारे यांच्या निवासस्थानी पोलिसांनी झडती सुरू केली आहे. (Nandurbar Inspector Dnyaneshwar Vare remanded to 3 days police custody)
यात नवापूर येथील शासकीय निवासस्थानी मोठी रक्कम हाती लागल्याचे बोलले जात आहे. वारे यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुजरात पोलिसांनी अटक करू नये, प्रोटेक्शन मिळावे, यासाठी नवापूर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती अडीच लाख देण्याचे कबूल झाले. पैकी एक लाख दिले होते.
पन्नास हजारांची लाच घेताना वारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. पुढील कारवाईसाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले होते. गुरुवारी वारे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस नाईक गणेश निंबाळकर, पोलिस शिपाई नितीन नेटारे यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक संदीप घुगे अधिक तपास करीत आहेत.
गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करा
दीड-दोन वर्षांपासून नवापूर शहरासह तालुक्यात गांजा व गांजामिश्रित सिगारेट विक्रीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवकांचे यात प्रमाण जास्त दिसत आहे. गाव-पाड्यावर अशा नशायुक्त सिगारेट सहज उपलब्ध आहेत. यापूर्वी तालुक्यात गांजाविक्री अथवा तस्करी कधी झाली नाही. (Latest Marathi News)
दोन-चार दिवसांपूर्वी गांजा तस्करी पकडली गेली होती. नवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय शाखेचे पोलिस कर्मचारी आपली मनमानी करत गैरसमज पसरविण्याचे काम करत होते. या प्रकरणात गोपनीय शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
२६ लाखांची रोकड हस्तगत
निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नवापूर येथील शासकीय निवासस्थानी पोलिस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, जितेंद्र महाले, विलास पाटील, भारती आगळे यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत २५ लाख ८७ हजार २३० रुपयांची रोकड मिळून आली. नाशिक येथील निवासस्थानी २५ हजारांची रोकड मिळाली. ऐवज व कागदपत्रांची अद्याप तपासणी सुरू असून, त्यात काय निष्पन्न होते, याकडे नवापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.