State president Jayant Patil speaking at a meeting of loyal workers of NCP. esakal
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil : सत्ताधारी पक्षाला राज्यातून बाद करा : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

शहादा : भाजपने संविधान बदलण्यासाठी प्रयत्न केला होता; परंतु जागृत मतदारांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र हे अभियान सुरू केले आहे. (Jayant Patil statement Throw out ruling party from state)

अभियान तळागाळातील जनतेपर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रातून बाद करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. २२) केले. येथील जैन प्लाझा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे निष्ठावान कार्यकर्ता संवाद मेळावा झाला.

या वेळी ते बोलत होते. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप परदेशी, डॉ. तुषार सनंसे, कमलेश चौधरी, तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष एन. डी. पाटील, अल्पसंख्याक विभागाचे ॲड. दानिश पठाण, मंजुळा पाडवी, रेश्मा पवार आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यात खंबीर पक्ष संघटन बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच निरीक्षकांची नेमणूक करून नवीन पक्ष संघटन बांधण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. आदिवासी क्षेत्रात पेसा कायदा, बिंदुनामावलीसोबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. (latest marathi news)

बेरोजगारी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला आहे. केळी, पपईला आधारभूत किमती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे सरकार घालविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर माझा स्वप्नातला महाराष्ट्र कसा राहील हे अभियान राबवून जनतेत जागृती करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यकर्त्यांनो, कामाला लागा ः खडसे

रोहिणी खडसे म्हणाल्या, की विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्या दृष्टिकोनातून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे संघटन मजबूत केल्याशिवाय निवडणुकीत यशस्वी होता येत नाही. महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी आहे. संघटनवाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळ कमी आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. दरम्यान, डॉ. विशाल कुवरसिंग वळवी यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT