Vijaykumar Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार पहिल्या हप्त्याची भेट : डॉ. विजयकुमार गावित

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्ष लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते देण्याचे नियोजन असल्याने सर्व पात्र भगिनींनी या योजनेचे फॉर्म लवकरात लवकर भरावेत, जेणेकरून कोणतीही भगिनी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nandurbar ladki bahin yojana will get first installment gift on Rakshabandhan)

डॉ. गावित म्हणाले, की राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अभिनव योजना जाहीर केली असून, तिची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या योजनेचा पात्र सर्व महिलांनी लाभ घ्यावा. या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शहरी भागात वॉर्ड ऑफिसर नेमण्यात आले असून, काही पक्ष, संघटना त्यांच्या स्तरावरदेखील या योजनेचे फॉर्म भरताना दिसत आहेत.

फॉर्म कुठेही भरावा, मात्र तो योग्य पद्धतीने भरला गेला तरच त्याचा लाभ महिलांना मिळणार आहे. म्हणून ज्या ठिकाणी विश्‍वासार्हता आहे अशाच ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरावा. ३१ जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरले गेले असतील त्यांची छाननी करण्यात येऊन पात्र लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी दीड हजार असे तीन हजार रुपये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

ही महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट राहणार आहे. ज्या महिलांचे फॉर्म ३१ जुलैपर्यंत भरले गेले नाहीत त्यांनाही लाभ मिळेल; परंतु तो रक्षाबंधनाला मिळणार नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण आल्यास लाभ मिळण्यास विलंब होऊ शकेल.

काही जण ही योजना कशी ‘फेल’ होईल आणि शासनाची बदनामी होऊन त्यांना त्याचा कसा लाभ होईल, असाही प्रयत्न केला जात आहे. काही लोकांनी फक्त अर्ज भरून संबंधित विभागाकडे जमा न करता त्यांच्याकडेच ठेवले आहेत, अशा लोकांपासून महिलांनी सावध राहावे, असेही ते म्हणाले. (latest marathi news)

अर्ज काटेकोरपणे भरावा

डॉ. गावित म्हणाले, की अर्जांची छाननी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या समितीने छाननी करून पात्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणून महिलांनी अर्ज अत्यंत काटेकोरपणे भरला गेला की नाही याची खात्री करावी, जेणेकरून त्यांचा अर्ज बाद होणार नाही.

आतापर्यंत ग्रामीण भागात ५१ हजार महिलांनी योजनेचे अर्ज भरले आहेत. त्यांपैकी २५ हजार अर्ज ऑनलाइन भरण्यात आले असून, उर्वरित अर्ज ऑफलाइन भरण्यात आले आहेत. शहरी भागात दहा हजार महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले आहेत.

७ ते ९ दरम्यान विश्‍व आदिवासी दिन

डॉ. गावित म्हणाले, की दर वर्षी ९ ऑगस्टला विश्‍व आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. यंदा ७ ते ९ ऑगस्टदरम्यान विश्‍व आदिवासी दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही दिवसांत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. ९ ऑगस्टला तिन्ही दिवसांत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT