Nandurbar Lok Sabha Constituency bjp vs congress esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चालणार कोणाची जादू ?

Lok Sabha Constituency : नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून देशाचा नकाशावर नोंदविला गेला आहे. त्यामुळे येथील राजकीय आरक्षणही अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा निवडणुकीत २०१४ ला परिवर्तन घडले ते मोदी लाटेमुळे, मात्र आता मोदी लाट कमी झाली असल्याचे दिसून येत असले तरी मोदी -राहूल यांच्या गॅरंटी फॅक्टरवर मात्र त्यांचा पक्षाचे उमेदवार प्रचारात जोर देत आहेत. भाजपवाले म्हणतात, ‘मोदी की गॅरंटी’ तर कॉंग्रेसवाले म्हणतात,‘राहुल की गॅरंटी’. (Nandurbar Lok Sabha Constituency)

त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदार संघात आता कोणाची गॅरंटी जादू करते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून देशाचा नकाशावर नोंदविला गेला आहे. त्यामुळे येथील राजकीय आरक्षणही अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. येथे आदिवासी समाजाची वस्ती ६० टक्के आहे.

असे असले तरी आदिवासी समाजाचे यापूर्वी केवळ अन् केवळ गांधी घराण्यावरच निष्ठा होती. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदार संघ हा वर्षानुवर्षे कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. एवढा विश्‍वास आदिवासी जनतेचा गांधी घराण्यावर होता. मात्र २०१४ ला परिवर्तनाची लाट अन् शहरी भागातील सुज्ञ व शिक्षित मतदारांना लागलेली परिवर्तनाची ओढ, यामुळे मोदी लाट तुफानासारखी आली.

त्यात कॉंग्रेसचा कुठे थांगपत्ताही लागला नाही. या लाटेने टॉप टेन खासदार असलेले (स्व.) माणिकराव गावितांना पराभूत करीत नवखे व तरूण उमेदवार असलेल्या डॉ. हिना गावित यांना खासदार म्हणून स्विकारले. म्हणजेच नंदुरबारकर निष्ठा, विश्‍वास, कामे सर्व बाजूला ठेवून परिवर्तनही घडवू शकते, याची झलक २०१४ च्या निवडणुकीत दाखविली. (Latest Marathi News)

सध्याचा निवडणुकीतही भाजप व कॉंग्रेसचे उमेदवार समोरासमोर आहेत. भाजपचे खासदार म्हणून डॉ. हिना गावित असून यावेळीही त्याच उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचे मुद्दे त्यांनी केलेली विकास कामे, जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी हे जरी असले तरी त्यांच्या पक्षातर्फे ‘मोदी की गॅरंटी’ या फॅक्टरवर अधिक जोर दिला जात आहे.

मोदींनी दिलेच्या गॅरंटीच्या योजना व उपक्रमांचा जाहिरनामा फ्लॅश केला जात आहे. त्यातच खासदार म्हणून गेली दहा वर्षे नंदुरबार लोकसभेतील मतदार डॉ. हिना गावित यांच्या कामाशी ज्ञात आहेत. २०१४ ला डॉ. हिना गावित याही नवख्या उमेदवार होत्या. त्यांनी टॉप टेन खासदारांपुढे मोठे आव्हान उभे केले होते.

तसेच कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हे निवडणुकीत नवखे आहेत. मात्र त्यांना वडिलांची राजकीय पार्श्‍वभूमी आहे. उच्च शिक्षित व जनतेशी संवाद साधत प्रचारात वैयक्तिक आकर्षण निर्माण करीत आहेत. त्यांच्या वडिलांनी केलेली कामे पूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी नसले तरी पुढील विजयानंतरचा अजेंडा घेऊन ते तरूणाईला आकर्षित करीत आहेत.

त्यासोबतच राहूल गांधी यांनी जाहिर केलेली ‘राहुल (कॉंग्रेस) की गॅरंटी’ कार्ड मतदारांमध्ये पोहोचवित आहेत. कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातील मुद्दे प्रभावीपणे मांडत आहेत. त्यामुळे भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षातर्फे आपल्या नेत्यांचे गॅरंटी कार्ड वापरले जात आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील जनता भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी १० वर्षात केलेल्या विकासाला व मोदी की गॅरंटीला साथ देतात की.

मग कॉंग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांच्या भविष्यातील विकासाचे व्हीजन अन् राहूल गांधी यांच्या गॅरंटीवर विश्‍वास दाखवितात. हे आता निकालातूनच मतदार राजा दाखवेल. मात्र या ‘काटे की टक्कर’मध्ये दोघापैकी कोणाला मतदार कल देतील याची काहीही गॅरंटी आज तरी सांगता येत नाही, असे सध्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT