Nandurbar Lok Sabha Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : वाढलेले पावणेतीन लाख मतदान कोणाचा पथ्यावर पडणार ?

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीत गेल्या तीन पंचवार्षिकपासून मतदानाचा टक्का थोड्या फार फरकाने का होईना वाढत आहे. याही वर्षी सरासरी दोन टक्के मतदान वाढले आहे. दोन टक्के असले तरी ते मारे पावणे तीन लाख मतदान आहे. वाढलेल्या या पावणेतीन लाखांचा धनी कोण असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. वाढीव मतदान ज्याच्या पथ्यावर पडेल, तो नंदुरबारचा खासदार ,असे गोळा बेरीज करत चर्चा रंगू लागल्या आहेत. ()

नंदुरबार लोकसभा मतदार संघात २०१४ पासून विचार केल्यास नंदुरबार लोकसभेसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले होते. तर २०१९ ला ६८.३३ टक्के मतदान झाले होते. म्हणजेच २०१४ च्या तुलनेत पाच टक्यांनी मतदानाची आकडेवारी वाढली होती. त्यावेळी एकूण १८ लाख ७० हजार ११७ मतदार होते. त्यापैकी ११ लाख १४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

अत्यंत अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचे उमेदवार ॲड के.सी.पाडवी यांना पराभूत करीत डॉ. हिना गावित ९५ हजार पाचशे मतांनी विजयी झाल्या होत्या. आताचा २०१४ च्या निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या १९ लाख ७० हजार ३२७ एवढी आहे. त्यात काल १३ लाख ९२ हजार ६३५ मतदारांनी मतदान केले. एकूण ७०.६८ टक्के मतदान झाले.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत तुलनेत दोन टक्यांनी मतदान वाढले. टक्केवारीत दोन टक्के किरकोळ आकडा वाटत असला तरी वाढलेल्या मतदार संख्येमुळे दोन टक्के म्हणजे दोन लाख ७८ हजार ६३५ एवढे मतदान वाढले आहे. हे वाढलेले मतदान कोणाता पथ्यावर पडते हे आज तरी सांगणे कठीण आहे.

कारण भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्यासमोर कॉंग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी उमेदवार आहेत. त्यांनी स्वपक्षासह भाजपमधील नाराज गट, महायुतीतील मित्र पक्ष यांना आपलेसे करीत त्यांची मदत घेतली आहे. त्यामुळे वाढलेले मतदान ज्याचा पथ्यावर पडेल ,त्याला नक्कीच नंदुरबारची जनता खासदार म्हणून स्विकारेल,अशी चर्चा आहे. (latest political news)

विधानसभा -२०१९ झालेले मतदान - टक्के ---- २०२४ झालेले मतदान - टक्के

अक्कलकुवा - १६४९७६ - ७३.५२ ---- २२९४७३ - ७५.०१

शहादा - १९१२३९-७०.२१ ----- २४३६९८ - ७१.४९

नंदुरबार - - १९७१९७ - ६२.३९ ---- २२८४३७ - ६६.६७

नवापूर - १९८८१३- ७५.२८ ---- २३२५७९ -८०.१८

साक्री - १९०२८६ - ६५.३१ ---- २४१३३३ - ६७.६०

शिरपूर - १७१४८९ - ६५.१७ ----- २१७११५ - ६५.०५

एकूण - १११४००० - ६८.३३ ------ १३९२६३५ - ७०.६८

गृह भेटीतून झालेले मतदान

विधानसभा - दिव्यांग - ८५ प्लस - टपाली मतदान

अक्कलकुवा - २२ - १७१ - ५८

शहादा - ३५ -१२० - ८५

नंदुरबार - ५३ - १७० - २१८

नवापूर - १९ - १६१ - १२८

साक्री - ८० - ३६९ - २६

शिरपूर - १८ - ५६ - ३४

एकूण - २२७ - १०४७ - ५४९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT