Dr. Heena Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : डॉ. हिना गावित ठरल्या पहिल्या महिला खासदार, हॅटट्रीक करणार का ?

Nandurbar News : स्वातंत्र्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पहिल्या महिला खासदार म्हणून विजयी होण्याचा मान डॉ. हिना गावित यांना जातो.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : स्वातंत्र्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पहिल्या महिला खासदार म्हणून विजयी होण्याचा मान डॉ. हिना गावित यांना जातो. गेल्या ७५ वर्षाचा राजवटीत अनेक महिलांनी उमेदवारी केली, मात्र त्यांना पराभवच पत्करावा लागला. डॉ. गावित यांनी सलग दोन पंचवार्षिक निवडणूका जिंकल्यामुळे पक्षाने त्यांना हॅटट्रीक करण्याची संधी दिली आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

त्यांचा राजकारणातील हा कार्यकाळ नंदुरबारच्या राजकीय इतिहासात नोंद होण्याजोगा आहे. राजकारणात महिलांनाही ३३ टक्के आरक्षण यापूर्वी दिले गेले आहे. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी तर राष्ट्रपतीपदापर्यंत प्रतिभाताई पाटील पोहचू शकल्या. एवढेच नव्हे; तर आजच्या स्थितीत ५० टक्के महिला राजकारणात विविध पदांवर कार्यरत आहेत.

असे असले तरी मागील राजकीय इतिहास पाहता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महिलांना फारसे प्राधान्य दिले गेल्याचे दिसून येत नाही. ज्या महिलांनी उमेदवारी केली, त्यांना फारसा प्रतिसादही मिळालेला दिसत नाही. त्याला तत्कालिन पुरूषप्रधान संस्कृती असो किंवा राजकारणातील पुरूषांचे वजन अथवा आर्थिक बाजू या सारख्या नानाविध गोष्टींचा अडसर असू शकतो.

मात्र हा अडसर मोडीस काढण्याचे काम भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या रूपाने झाले आहे. मागील विचार केला तर तत्कालिन राजकारणात एकतर्फी वर्चस्व असलेले सुरूपसिंग नाईक, माणिकराव गावित यांच्यासमोर महिला उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणे म्हणजे मुंगी ने हत्तीशी झुंज देण्यागतच अवस्था होती. (latest marathi news)

तरीही महिलांनी आपल्या राजकारणातील सहभागासाठी उमेदवारी केल्याची नोंद आहे. त्यात १९८० मध्ये अपक्ष म्हणून भुरीबाई मानसिंग शेमळे यांनी उमेदवारी केली होती. तरीही त्यांनी एकटीने त्यावेळी १६ हजार २४६ मत्ते मिळविली होती. त्यानंतर त्या पुन्हा १९९९ मध्ये माकपतर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

त्यावेळी त्यांना माकपच्या कार्यकर्त्यांची मदत मिळाली. मात्र सत्ताधारींच्या गराळ्यात त्यांना यश आले नाही. तरीही १३ हजार ६२५ मते मिळाली होती. त्यानंतर २००९ ला मंजूळा कोकणी यांनी भारीपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुक लढविली.त्यांना ६४३१ मते मिळाली.त्याच निवडणुकीत बबिता करमसिंग पाडवी यांनीही बसपातर्फे उमेदवारी केली.

त्यांना ११ ७८० मते मिळाली होती. तर २०१४ ला भाजपतर्फे डॉ. हिना गावित यांनी उमेदवारी केली तर त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. २०१९ ला पुन्हा भाजपने त्यांनाच उमेदवारी कायम ठेवली. त्यावेळी रेखा सुरेष देसाई यांनीही उमेदवारी केली. म्हणजे दोन महिला व चार पुरूष उमेदवारी रिंगणात होते. त्यातही हिना गावित यांनी खासदारकी कायम राखली.

रेखा देसाई यांना ११ हजार ४ ६६ मते मिळाली होती. तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा हिना गावित यांना उमेदवारी दिली आहे. मात्र इतर पक्षाकडून अथवा अपक्ष म्हणून दुसऱ्या महिला उमेदवाराचे नाव आजपर्यंत तरी चर्चेत नाहीत. त्यामुळे एकंदरीतच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात सतत खासदारी मिळवित उच्च शिक्षित खासदार म्हणून राजकारणात यशस्वी होण्याबाबतची नोंद नंदुरबारचा राजकीय पटलावर अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT