Nandurbar Lok Sabha Constituency : लोकसभेचा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. अशातच पुरूषी संस्कृतीला छेद देत भाजपने थेट लोकसभेच्या निवडणुकीत महिलांनाच अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नाशिक विभाग म्हणजेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास भाजपने चार तर कॉंग्रेसने एक असे पाच महिला उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे या पाचही रणरागिणींसमोर पुरूष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ()
त्यामुळे महिला उमेदवारांच्या लढतीची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुका सुरू आहेत.अनेक दिवस उमेदवार घोषित करण्याबाबत काथ्याकूट पक्षीय स्तरावरून झाला. त्यात नंदुरबार, रावेर व दिंडारी मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदारांनाच उमेदवारी घोषीत करीत बाजी मारली. तर जळगावच्या उमेदवार घोषित करण्यात भाजपला बराच वेळ घ्यावा लागला.
त्यातच उमेदवारी घोषित झाल्यावरही उणेदवार बदलाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर धुळे मतदारसंघात सक्षम उमेदवार कॉंग्रेसला मिळत नसल्याने थेट नाशिक येथील रहिवाशी व माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात पक्षाने उतरविले आहे. नाशिक विभागात नंदुरबारच्या डॉ. हिना गावित, रावेरच्या रक्षा खडसे व दिंडोरीच्या डॉ.भारती पवार या तिन्ही उमेदवार भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. (latest political news)
डॉ. हिना गावित व रक्षा खडसे या दोघीही गेली दहा वर्ष आपल्या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. तर डॉ.भारती पवार या मागील पाच वर्ष नेतृत्व करीत आहेत. त्या केंद्रात आरोग्य राज्यमंत्री आहेत. या निवडणूकीत हे तिन्ही विद्यमान खासदार उमेदवार म्हणून भाजपने ‘जैसे थे’ ठेवले. तर जळगावसाठीही स्मिता वाघ यांच्या रूपाने खासदारकीसाठी चौथ्या महिला उमेदवार भाजपने दिला आहे.
भाजपच्या चार महिला निवडणुकीचे रणांगण गाजवित आहेत. तर कॉंग्रेसनेही डॉ. शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पाचव्या महिला उमेदवाराची भर घातली आहे. विशेष म्हणजे या पाचही महिला उमेदवारांसमोर पुरूष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पाचही महिला उमेदवार उच्च शिक्षित, लढवय्या व राजकियदृष्ट्या सक्षम आहेत. यापैकी १३ मेस चौथ्या टप्यातील नंदुरबार व जळगाव आणि रावेर लोकसभेचे मतदान पार पडले आहे.
आता २० मे.रोजी पाचव्या टप्यात धुळे व दिंडोरीचे मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होईल. त्यामुळे पाचपैकी किती महिला संसदेत उत्तर महाराष्ट्रातील जनतेची बाजू मांडण्यासाठी पोहचतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. मागील पाच वर्षे डॉ. हिना गावित, रक्षा खडसे व डॉ.भारती पवार या तिन्ही रणरागिणींनी संसदेत आपल्या मतदार संघासाठी आवाज बुलंद केले होते. यावेळी काय घडते, त्याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.