Nandurbar Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : सर्वाधिक मतदान कोणाच्या पत्थ्यावर पडणार? पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांत तर्कवितर्कांना उधाण

Lok Sabha Constituency : सुरवातीला अगदी सोपे वाटणार गणित मात्र दिवसागणिक कठीण होत गेले. एकतर्फी वाटणारी निवडणूक मतदारांनी डोईजड केली.

विनायक सूर्यवंशी

Nandurbar Lok Sabha Constituency : ग्रामपंचायत सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही. वडील माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी राजकारणी मात्र मुलगा ॲड. गोवाल पाडवी राजकारणात सक्रिय नाही, तरी थेट खासदारकीसाठी उमेदवारी आणि एकीकडे दोन टर्म खासदार डॉ. हिना गावित. सुरवातीला अगदी सोपे वाटणार गणित मात्र दिवसागणिक कठीण होत गेले. एकतर्फी वाटणारी निवडणूक मतदारांनी डोईजड केली. ( Inciting arguments among office bearers activists and voter )

सत्ताधारी आणि वडिलोपार्जित राजकारणाचा वारसा व स्वतः दोन वेळा खासदार असणाऱ्या डॉ. हिना गावित व भाजपला मात्र रात्रीचा दिवस करावा लागला. तर एक दशकानंतर काँग्रेस पक्षाला आपला बालेकिल्ला ताब्यात येतो आहे, ही आशा पल्लवित झाली आहे. मतदारांनी भरघोस मतदान केले आहे, ते कोणाच्या पथ्यावर पडते हे ४ जूनला समजेलच, तोपर्यंत तर्कवितर्क यांना उधाण येत राहील.

लोकसभेची निवडणूक लागली. मतदारसंघात भाजपकडून डॉ. हिना गावित तर काँग्रेस पक्षाकडून ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली. ॲड. गोवाल पाडवी कोण येथून सुरवात झाली मात्र मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे मतदारांचा वाढता कल ॲड. गोवाल पाडवी यांच्या पथ्यावर पडला. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हिना गावित यांच्या परिवारावर नाराज एका गटाने ॲड.गोवाल पाडवी यांच्या बाजूने प्रचाराची धुरा सांभाळली.

त्यामुळे सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक खूप चुरशीची झाली व त्यामुळे विक्रमी मतदान झाले. लोकसभा नंदुरबार मतदार संघासाठी झालेल्या मतदानात विधानसभा नवापूर मतदारसंघात २ लाख ३२ हजार ५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ८०.१८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या विधानसभा नवापूर मतदार संघामध्ये कोणाच्या पथ्यावर पडणार, हे निकालानंतर समजणार आहे. (latest political news)

तिसऱ्या टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात उन्हामुळे राज्यात ठिकठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला असताना १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या नवापूरकरांनी मात्र उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानाला न जुमानता विक्रमी ८०.१८ टक्के मतदान करून आपले वेगळेपण जपले आहे. या विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे डॉ. हीना गावित व महाविकास आघाडीचे अॅड. गोवाल पाडवी या उमेदवारांत अत्यंत चुरशीच्या लढतीत कोणता उमेदवार मतदारांच्या पसंतीला उतरलाय हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

तर दोघा बाजूच्या समर्थकांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. तर सामान्य मतदारांकडून मात्र, आपापल्या परिने अंदाज बांधण्यात येत आहेत. नवापूर मतदारसंघात प्रत्येक बूथवर, प्रत्येक गावात किती मतदान होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कोणत्या गावात कोणाचे प्राबल्य आहे व तेथे किती मतदान झाले, यावर विजयाचे आराखडे बांधले जातात, त्यामुळेच आकडेवारीला विशेष महत्व आहे.

नवापूर विधानसभा मतदारसंघात आमदार शिरिषकुमार नाईक, माजी आमदार शरद गावित, आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, काँग्रेस तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित, भाजपाचे एजाज शेख, राजू गावित यांच्यासह कॉंग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी मतदारसंघात प्रचार केला. लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होत नसला तरीही विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भावी आमदारांसाठी ही निवडणूक भविष्याचा आरसा दाखविणारी ठरणार असल्याचेही बोलले जात आहे.

या गावांमध्ये झाले विक्रमी मतदान-

बिलाडी ९६.३३ टक्के, बंधारफळी ९४.६९ टक्के, करंजाळी ९४.०२ टक्के, तलावीपाडा ९३.६९ टक्के, सोनपाडा ९३.५२ टक्के असे मतदान पहिल्या पाच केंद्रांवर झाले असून सुमारे २१५ हून अधिक केंद्रावर सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे. २ लाख ९० हजार ०५७ एकूण मतदार असून यापैकी २ लाख ३२ हजार ५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने ८०.१८ टक्के मतदान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT