Nandurbar Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : चर्चा, दे धक्काची...

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना फारसे महत्त्व न देण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या कृतीमुळे सध्या येथे एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला आहे, तो म्हणजे ‘दे धक्का’ तंत्र... सध्या स्थानिक राजकीय संघर्ष खूप टोकाला पोचला आहे. मान-अपमानासोबतच सत्तेची बेरीज. (Nandurbar Lok Sabha Constituency)

विरोधकांच्या कामांना खोळंबा असो की, विरोधकांना कोंडीत पकडण्याचे काम असो, हे येथील राजकारणात नेहमीचेच झाले आहे. त्यातूनच खरंतर राजकीय संघर्ष पेटला आहे. निवडणूक आली, की एकाप्रकारे पाच वर्षांचा हिशेब चुकता करण्याचीच वेळ समजून येथे राजकीय मंडळी आपले डावपेच खेळत असतात.

सध्या येथील भाजप महायुतीसोबत शिंदे शिवसेना राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट आहेत. राज्यात युती असली तरी येथे युतीधर्म पाळला जात नसल्याचा थेट आरोप मित्रपक्षांकडून सतत होत आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित आहेत. त्यांना मित्रपक्षाने मदत केली पाहिजे. त्यांच्या प्रचारात सहभागी झाले पाहिजे, त्यांना निवडून आणण्यासाठी मदत केली पाहिजे.

मात्र तसे चित्र सध्या तरी दिसत नाही. कारण उमेदवारासह भाजपच्या नेत्यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना विश्‍वासात घेतलेले नाही. बैठक, नियोजनासाठी बोलविले नाही. कसलेही निमंत्रण प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून दिले गेले नाही, असे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

राजकारण बाजूला ठेवून जुळवून घेत भाजपने किंवा गावित कुटुंबीयांनी सामंजस्याने घेतले पाहिजे होते, अशी अपेक्षा मित्रपक्षाकडून होती. ते झाले नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असो की शिंदे शिवसेनेचे नेते असो, दोघा पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिकडे निमंत्रण तिकडे जाणे पसंद केले आहे. त्यांना नेतेही थांबवू शकलेले नाहीत.

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी विरोधी भाजपच्या उमेदवाराला पाठिंब्याचा धक्का देऊन निवडून आणण्यासाठी दे धक्का... तंत्र वापरले होते. तशीच स्थिती आताच्या लोकसभा निवडणुकीतही आहे. त्यामुळे ‘दे धक्का’ तंत्र प्रत्यक्षात खरे ठरते की चर्चा ही चर्चाच ठरते, हे वेळच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT