Voting machines and voting materials prepared for distribution in Tehsil Office. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : लोकशाहीच्या उत्सवासाठी यंत्रणा सज्ज! आज मतदान साहित्याचे वितरण

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत १३ मेस मतदान होत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी रविवारी (ता. १२) नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency Distribution of voting materials today)

शिरपूर मतदारसंघात ३३३ केंद्रे

शिरपूर विधानसभा मतदारसंघात ३३३ मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरी भागातील ५३, तर ग्रामीण भागातील २८० मतदान केंद्रांचा समावेश आहे. तालुक्यात सांगवी येथील दोन केंद्रे संवेदनशील आहेत. शिरपूर उपविभागात समाविष्ट शिरपूर, थाळनेर, सांगवी पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत या केंद्रांवर पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

तीन लाखांवर मतदार

शिरपूर मतदारसंघात एकूण तीन लाख ३० हजार ४७७ मतदार आहेत. त्यात एक लाख ६८ हजार ६६८ पुरुष, एक लाख ६१ हजार ८०९ महिला व १० लिंगरहित मतदारांचा समावेश आहे. मतदारसंख्येत दोन हजार २४८ दिव्यांग, तर ८५ वर्षे वयावरील तीन हजार ३०७ मतदारांचा समावेश आहे. (latest marathi news)

१,६६५ कर्मचारी

मतदारसंघातील ३३३ मतदान केंद्रांवर प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण एक हजार ६६५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदारसंघात एकूण ३२ सेक्टर असून, प्रत्येक सेक्टरसाठी एक वाहन नियुक्त करण्यात आले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी ३९९ मतदान यंत्रे, ३९९ कंट्रोल युनिट व ४३२ व्हीव्हीपॅट युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना १२ मेस सकाळी मतदान साहित्यवाटप करून नियुक्तीच्या ठिकाणी रवाना केले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी महेंद्र माळी, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आर. पी. कुमावत यांनी दिली.

टक्केवारीची उत्सुकता

यापूर्वीच्या टप्प्यात झालेले मतदान आणि निवडणुकीतील चुरस लक्षात घेता किती मतदान होईल याबाबत मतदारांत उत्सुकता वाढली आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिरपूर मतदारसंघात ६५.१७ टक्के मतदान झाले होते.

पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६५.७९ टक्के मतदान नोंदविण्यात आले होते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महसूल व निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले असून, त्यांना मतदारांचा कसा प्रतिसाद लाभला हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT