Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदार संघ हा तत्कालिन धुळे जिल्ह्यात समाविष्ट होता. तेव्हापासून तर २०१४ पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत आठवेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून येत इतिहास रचण्याचे काम (स्व.) माणिकराव गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात केले आहे. केवळ आठवेळा निवडून येणे एवढेच नाही; तर देशातील टॉपटेन खासदारांमध्ये स्थान मिळविण्याचाही इतिहास त्यांनी घडविला आहे. त्यामुळेच नंदुरबार मतदारसंघ हा दिल्लीच्या सत्तेतील हुकमी एक्का ठरला होता. कॉंग्रेसचा पंजा व इंदिरामाय ही ओळख या मतदारसंघातून गावित यांच्या विजयी घौडदौडीमुळे राजकिय पटलावर कोरली गेली आहे. (Nandurbar Lok Sabha Election 2024)
देशात लोकसभा निवडणुकीचा नंदुरबार मतदार संघ हा एक क्रमांकाचा मतदार संघ आहे. देशातील पहिला मतदार याच जिल्ह्यातील व मतदारसंघातील आहे. या मतदारसंघात साधारण ६० टक्के आदिवासी मतदारांची संख्या असल्याने ही जागा अनुसूचित जमाती (एस.टी.) राखीव आहे. इंदिरा गांधीच्या काळापासून येथील आदिवासी जनता कॉंग्रेसचे हक्काचे मतदार होते.
त्यांनी त्या काळात राबविलेल्या विविध आदिवासी समाजाच्या कल्याणकारी योजनांमुळे इंदिरा गांधी यांना येथील जनता इंदिरामाय म्हणून संबोधत. कॉंग्रेसचे येथील वाढते प्राबल्य लक्षात घेऊन इंदिरा गांधींपासून आजपर्यंत लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन फुटायचा.
येथे पहिला प्रचाराचा नारळ फुटला म्हणजे नंदुरबार लोकसभा जिंकल्यात जमा आहे व देशात कॉंग्रेसची सत्ता येते, असे समीकरणच बनले होते. त्यामुळे कॉंग्रेसचा पंजा आणि नंदुरबारची जनता हे समीकरण पक्का बनल्याने व इतर पक्षाची जिल्ह्यात फारसी ताकद नसल्याने नंदुरबार मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. (latest marathi news)
त्यामुळे १९८४ ते २०१४ असे आठ वेळा खासदार म्हणून विजयाची माळ माणिकराव गावित यांच्या गळ्यात पडत गेली. गावित यांची साधी राहणी, कधीही मोठेपणा किंवा ताठरपणा नाही. गोरगरिबांसाठी रस्त्यावरही गाडी थांबवून आस्थेवाईकपणे विचारपूस करणारा नेता म्हणून त्यांची ओळख अजून कोणीच पुसू शकलेले नाही.
स्व. इंदिरा गांधीपासून तर राहूल गांधीच्या नेतृत्वापर्यंत त्यांनी पक्षाची निष्ठा व गांधी घराण्याचा विश्वासाल तडा जाऊ दिला नाही.त्यामुळे गेल्या ३० वर्षात नंदुरबार मतदारसंघात कॉंग्रेसवर कधीही उमेदवार शोधण्याची वेळ आली नाही व गावित यांनाही पक्षी श्रेष्ठींकडे उमेदवारी मागण्याची वेळ आली नव्हती.
लोकसभा निवडणुक आली म्हणजे उमेदवाराचे नाव निश्चित असायचे . त्यामुळे येथील मतदारही माणिकराव गावितांवर प्रेम करायचे. त्यामुळे आठ वेळा देशातील टॉपटेन खासदारांमध्ये सर्वाधिक मत्ताधिक्याचा विक्रम करीत ३० वर्ष कॉंग्रेसचे खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी गावित यांना मिळाल्याचा इतिहास आहे.२०१४ मध्ये डॉ. हिना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.