While welcoming Priyanka Gandhi, former minister K. C. Padavi, Mrs. Padavi etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Pariyanka Gandhi Nandurbar Sabha : भाजपच्या काळात अत्याचार, महागाई वाढली : प्रियांका गांधी

Nandurbar Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत शनिवारी (ता. ११) त्या बोलत होत्या. त्यांचे ११.३५ ला मंचावर आगमन झाले. त्यांना आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले दागिने भेट देऊन ॲड के. सी. पाडवी यांनी स्वागत केले.

सकाळ वृत्तसेवा

Pariyanka Gandhi Nandurbar Sabha : मोदी सरकारच्या दहा वर्षांत डिझेल-पेट्रोल, गॅस या अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढले. महागाईने कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य व्यक्ती कष्टातून येणाऱ्या पैशांमध्ये आपल्या मुलांचे आजारपण, शिक्षणशुल्क भरू शकत नाहीत, तर शेतकऱ्यांना मुलाच्या लग्नासाठी कर्ज काढावे लागत आहे. (Nandurbar Lok Sabha Election 2024 )

ते कर्ज फेडू शकत नाहीत म्हणून शेतकरी आत्महत्या करू लागला आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी येथे केला. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत शनिवारी (ता. ११) त्या बोलत होत्या. त्यांचे ११.३५ ला मंचावर आगमन झाले. त्यांना आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले दागिने भेट देऊन ॲड के. सी. पाडवी यांनी स्वागत केले. (Nandurbar lok sabha election 2024 Priyanka Gandhi Sabha)

त्यानंतर त्यांनी सुमारे ४२ मिनिटे संबोधित केले. त्यात त्यांनी आदिवासी क्रांतिकारक, शहीद शिरीषकुमार व याहा देवमोगरा यांचा नामोल्लेख करीत भाषणाला सुरवात केली. त्या म्हणाल्या, की कोणतीही निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ माझी आजी इंदिराजी नंदुरबारपासून करत होत्या.

त्यांना आदिवासी संस्कृतीची आवड होती. त्या तुमचे प्रश्‍न, तुमचे अधिकारासाठी लढत होत्या. आदिवासी संस्कृतीचा सन्मान करीत. त्यांची शिकवण माझे वडील राजीव, आई सोनिया गांधी व आता आम्ही जपतो आहोत असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

त्या म्हणाल्या, की मोदी राजकीय फायद्यासाठी सुंदर बोलतात. मात्र त्यांचा पक्ष नेहमी आपला अपमान करतो. मोदींनी शेकडो शबरींवर अत्याचार होताना आपले तोंड बंद ठेवले. यूपीच्या युवतीवर अत्याचार करून जिवंत जाळले गेले. मोदी सरकारने त्यांच्या मदतीसाठी काहीही केले नाही.

खेळाडू विजयी झाले तर मोदी घरी बोलवून त्यांना चहा पाजून सन्मान करतात. त्याच महिला खेळाडूंवर भाजप नेत्याकडून अत्याचार होतो त्यावर ते बोलत नाहीत. मोदी म्हणतात, भ्रष्टाचाराविरोधात मी एकटा लढतो. त्यांच्याकडे सत्ता व यंत्रणा आहे तर एकटे कसे? निवडणुकीच्या काळात मंचावर येताच रडतात.

इंदिराजींपासून शिकवण घ्या, ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, वाजपेयी यांच्यासारखे लोकांपासून शिकवण घ्या. आपल्या दहा वर्षांत काय केले हे सांगण्याची त्यांच्यात हिंमत नाही. महागाई, भ्रष्टाचार वाढला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्नकार्यासाठी कर्ज घ्यावे लागते.

शेतकरी लाखाचे कर्ज फेडू शकत नाही, त्यामुळे आत्महत्या करतात. खरबोपती लोकांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाहीत. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले, असे सांगत त्यांनी आदिवासीच्या घरात मोदींनी भेट दिल्याचा एकतरी फोटो दाखवा, असे आव्हान प्रियांका गांधी यांनी दिले.

...अन् प्रियांका अचानक जनतेमध्ये मिसळल्या

शनिवारच्या सभेला महिला-पुरुषांची चांगली गर्दी होती. सभा आटोपल्यावर प्रियांका निघाल्या. गाडीत बसल्या अन् मंचाच्या मागून गाडी पुढे गेल्यावर थांबवून अचानक त्या महिलांचा गर्दीच्या दिशेने अभिवादन करत गेल्या. त्यांना पाहताच महिला-पुरुषांनी गराडा घातला. या वेळी सुरक्षा यंत्रणेची मात्र धावपळ उडाली. सुमारे दहा मिनिटे गर्दीत होत्या. (nandurbar political news)

प्रियांका यांच्याकडून ‘काँग्रेस की गॅरंटी’

-गरिबाला २५ लाखांपर्यंत आजारावरील उपचार मोफत.

-गरिबाला वर्षाला एक लाख देणार.

-युवकांना नोकरी देणार, ३० लाख बेरोजगारांना रोजगार देणार.

-शेतकऱ्यांच्या मालाला भावासाठी कायदा बनविणार.

-कृषी मालावरील जीएसटी रद्द करणार.

-शहरात १०० दिवसांचा मनरेगाच्या धर्तीवर रोजगार देणार.

-एसटी, एससी, ओबीसींच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार.-जास्त आदिवासी संख्या असलेले क्षेत्र विशेष क्षेत्र घोषित करणार.

प्रियंका म्हणाल्या...

-आदिवासींची जमीन मोठमोठ्या उद्योजकांना दिली जात आहे.

-एकमेव आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोदी सरकारने तुरुंगात टाकले.

-जेथे काँग्रेसची सत्ता तेथे विकासाची हमी.

-राहुल गांधी एकमेव नेता ज्याने काशी‍मिर ते कन्याकुमारी चार हजार किलोमीटर पदयात्रा केली.

-सोनिया गांधी-मनमोहन सिंग यांनी नंदुरबापासून मनरेगाची सुरवात करून रोजगाराची गॅरंटी दिली.

-इंदिराजी म्हणत आदिवासी संस्कृती देशातील सर्वोत्कृष्ट संस्कती.-भाजपची विचारधारा आदिवासी संस्कृती समजत नाही, आदर करत नाही.

-जेव्हा जेव्हा आदिवासींवर अत्याचार झाला तेव्हा भाजप नेते चूप का होते.

-मणिपूर घटनेवर प्रधानमंत्री चूप का राहिले?

-अत्याचार थांबविण्यासाठी काहीही केले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT