Taloda Taluka Map & Gowal Padvi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Election 2024 Result : तळोदा तालुक्याची ॲड. पाडवींच्या यशात महत्त्वाची भूमिका!

फुंदीलाल माळी

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी उमेदवार काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांच्या यशात तळोदा तालुक्याच्या मोठा वाटा राहिला. तालुक्यातून तब्बल २१ हजारांहून अधिक मताधिक्य ॲड. पाडवी यांना मिळाले. यातही ग्रामीण भागातील मतदारांनी पाडवींना मताधिक्य दिले, तर शहरी भागात डॉ. हीना गावित यांना मताधिक्य मिळाले. तळोदा तालुक्याचा हाच मूड भविष्यात विधानसभेलादेखील राहिल्यास काँग्रेसच्या आशा वाढणार आहेत. भाजपला यातून बोध घ्यावा लागणार आहे. (Nandurbar Lok Sabha Election 2024 Result success of Adv goval Padavi)

शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात संपूर्ण तळोदा तालुक्याच्या समावेश होतो. यंदा लोकसभा निवडणुकीत तळोदा तालुक्यातील ९३ हजार २१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात तालुक्यात आरक्षण, संविधान बदल या मुद्द्यांची चर्चा होती, तर मणिपूर घटनेबाबत नाराजी होती.

भाजपने प्रचारात केलेल्या विकासकामांवर भर दिला होता, तर काँग्रेसने तालुक्यात ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला. त्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होम टू होम भेटी देण्यात कमी पडल्याचे दिसून आले होते. तळोदा शहरात भाजपची प्रचारसभा मात्र झाली होती, तर काँग्रेसची शहरात एकही सभा झाली नाही.

दुसरीकडे तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातून काँग्रेसला मोठा फायदा झाला. म्हणजेच महाविकास आघाडी एकसंध होती, तर भारतीय जनता पक्षाच्या शहर व तालुक्यातील नेत्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्येदेखील एकवाक्यता दिसून आली नाही. (latest marathi news)

काँग्रेसकडे कोणताही मोठा नेता नसताना तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांनीदेखील आपले काम चोख बजावल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातून ॲड. पाडवी यांना मताधिक्य मिळाले, तर शहरातून मात्र डॉ. गावित यांना जास्त मते मिळाली. --

ग्रामीण भागाची निर्णायक भूमिका

तळोदा शहरात डॉ. गावित यांना नऊ हजार १२८, तर ॲड. पाडवी यांना सहा हजार ५८३ मते मिळाली. याउलट ग्रामीण भागात ॲड. पाडवी यांना ४७ हजार २४२, तर डॉ. हीना गावित यांना २६ हजार २०५ मते मिळाली. त्यामुळे ग्रामीण भागाने खासदार निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला तालुक्यात मोठी मेहनत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे, तर काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असून, कोणताही मोठा नेता तालुक्यात नसताना तालुक्याने मताधिक्य दिले असल्याने त्याबाबत एकच चर्चा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT