Dr. Hina Gavit, Adv. Goval Padavi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारमध्ये विकासकामे प्रचाराच्या केंद्रस्थानी; प्रस्थापित विरुद्ध नवखा उमेदवार आमने-सामने

Nandurbar News : विजयकुमार गावित आणि त्यांची कन्या डॉ. हीना गावित यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये आणलेली विकासाची गंगा हाच यंदाच्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : (स्व.) इंदिरा गांधी यांचा सर्वांत आवडता लोकसभा मतदारसंघ म्हणून नंदुरबारची ओळख संपूर्ण देशात होती. काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ नंदुरबारमधून व्हायचा. पण काळ आता बदलला आहे. काँग्रेसला इथे टिकाव धरण्यासाठी धडपड करावी लागतेय, तर भाजपचा झेंडा डौलाने फडकतोय. (Nandurbar Lok Sabha election development works at center of promotion)

विजयकुमार गावित आणि त्यांची कन्या डॉ. हीना गावित यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये आणलेली विकासाची गंगा हाच यंदाच्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे, हे आता स्पष्ट झालेले आहे. गावित यांचा अनुभव आणि हीना यांची धडाडी यामुळे काँग्रेस नंदुरबारमध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

गेली दहा वर्षे खासदार राहिलेल्या डॉ. हीना गावित यांचा राजकीय अनुभव, कार्यकर्त्यांची फळी, वाढलेला जनसंपर्क आणि दहा वर्षांत केंद्र सरकारच्या राबविलेल्या योजना ही त्यांची जमेची बाजू घेऊन त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यासह मैदानात येऊ पाहणाऱ्या दोघा-तिघांकडे जनतेला सांगण्यासारखे काही नाही.

त्यामुळे ही तुलना सध्या मतदारांकडून केली जात आहे. निवडणूक रिंगणात उमेदवार जनतेचे प्रश्‍न घेऊन हिरिरीने मांडतात. त्यात उमेदवार नवखे व प्रथमच निवडणूक लढवीत असतील तर ते सध्या जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत का? त्या गरजा कोणत्या आहेत, आतापर्यंत त्या सुटलेल्या नसल्यास आपण त्या कशा सोडविणार आहोत.

त्यासोबतच शेतकरी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, महिलांचे प्रश्‍न आदी विविध महत्त्वपूर्ण प्रश्‍न निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येतात, त्यावर चर्चा होते. आरोप-प्रत्यारोप होतात. रिंगणातील उमेदवार त्या सोडविण्याचे स्वप्न रंगविणारी आश्‍वासने देतात. एकंदरीत जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवडणुकीतील सर्वच आश्‍वासने जर-तर स्वरूपाची असतात. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातदेखील हीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. (latest marathi news)

भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा आधीच आलेला आहे. अन्य पक्षांचेही जाहीरनामे येतील. मात्र, विद्यमान खासदार स्थितीत सत्तेत कोण होते, ते किती वर्षे सत्तेत आहेत, त्यांचा जनतेसाठी चांगला-वाईट अनुभव, त्यांनी केलेली विकासकामे, सर्वसामान्यांचे सोडविलेले प्रश्‍न या मुद्द्यांभोवतीच निवडणुकीचा प्रचार रंगणार आहे.

त्यामुळे नंदुरबार लोकसभेतील उमेदवारांच्या राजकीय-सामाजिक कार्याची तुलना सर्वसामान्य जनता करत असल्याचे दिसत आहे. किंबहुना सत्ताधारी आणि विरोधी गटातील कार्यकर्तेदेखील याच मुद्द्यांभोवती समाज माध्यमांवर व्यक्त होत आहेत.

प्रमुख उमेदवारांचा तुलनात्मक आढावा

डॉ. हीना गावित

डॉ. हीना गावित दहा वर्षे खासदार आहेत. पक्षाने तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. मतदारसंघातील पक्षीय सर्वेक्षणात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. जनमत जाणून घेत पक्षाने तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचे वडील राज्याचे मंत्री आहेत. राज्यस्तरीय कामाचादेखील आपसूकच लाभ त्यांना होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्यांचा भगिनी आहेत, हीदेखील त्यांची जमेची बाजू आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविलेल्या कामांची यादीही त्यांच्याकडे मोठी आहे. हे झाले त्यांचा कुटुंबीयांच्य कामाचे. मात्र स्वतः डॉ. हीना गावित यांनी जलजीवन मिशन, जिल्ह्यातील महामार्ग, गावपातळीवरील रस्ते.

केंद्राची घरकुल योजना, स्थलांतर रोखण्यासाठी गरीब कुटुंबांना गायीवाटप, वैद्यकीय महाविद्यालय, आधुनिक आरोग्यसेवा, महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय, रेल्वे सेवा, उज्ज्वला गॅस योजना, दूरदर्शन केंद्र, मोबाईल टॉवर, केंद्रीय शिक्षण सुविधा प्रभावीपणे राबविल्याचे त्या सध्या ठासून सांगत आहेत. त्यामुळे या विकासकामांभोवती त्यांचा प्रचार सुरू आहे.

ॲड. गोवाल पाडवी

काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी नवखे उमेदवार असले तरी ते माजी मंत्री तथा आमदार के. सी. पाडवी यांचे चिरंजीव आहेत. उच्चशिक्षित आहेत. त्यांचे वडील दऱ्याखोऱ्यांत ४० वर्षे आमदार म्हणून कार्यरत आहेत. के.सी. यांच्या जनसंपर्काचा गोवाल यांना उपयोग होईल, असा त्यांचा होरा आहे. के.सी. यांनी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

मात्र, गोवाल यांच्या स्वतःच्या राजकीय कारकीर्दीची ही सुरवात आहे. वडिलांचे राजकीय कार्य, पक्षाचे बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद हीच काय त्यांची जमेची बाजू. सध्याच्या घडीला वंचित बहुजन आघाडी, आदिवासी संघटना व अन्य काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या तयारीत आहेत. मात्र त्यांची जनमानसातील ओळख, राजकीय ताकद, सर्वसामान्यांसाठी केलेले काम याची गोळाबेरीज केल्यास त्यांच्यासमोर भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्या कार्याचे, जनसंपर्काची फुटपट्टी मोठी करण्याचे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT