Nandurbar Lok Sabha Election : तळोदा शहरासह तालुक्यात भाजपची मजबूत स्थिती असतानादेखील काँग्रेससह महाविकास आघाडीने एकजुटीने व नेटाने प्रयत्न केल्याने गेल्यावेळी तालुक्यातून भाजपला मिळालेले मताधिक्य या वेळी मिळेल का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान, तळोदा शहरासह तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. (Differences of opinion among people regarding majority of votes)
त्यामुळे मतदारांचा हा उत्साह कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तळोदा शहरासह तालुक्यातील सातपुडा पर्वतालगत असलेल्या ग्रामीण भागाचा समावेश होतो. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपला, तर ग्रामीण भागात संमिश्र मताधिक्य मिळत आल्याचा अनुभव आहे.
या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित व काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्यातच प्रमुख लढत झाली. शहरात डॉ. हीना गावित यांची सभा झाली, तर ॲड. गोवाल पाडवी यांनी ‘होम टू होम’ भेट देऊन प्रचार करण्यावर भर दिला. त्यात दोन्ही उमेदवारांनी तालुक्याचा संपूर्ण ग्रामीण भागदेखील पिंजून काढला. दरम्यान, दोन वर्षांत तळोद्यातील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे.
याशिवाय आमदार राजेश पाडवी यांचा दांडगा जनसंपर्क व त्यांनी केलेली विकासकामे याच्या जोरावर तळोद्यात भाजपचे पारडे जड असल्याचे मानले जात होते. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह एकाकी किल्ला लढवल्याने सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत नंतर खूपच चुरशीची झाली. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. हीना गावित यांना तळोद्यातून चार हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते. (latest marathi news)
या निवडणुकीत भाजपची स्थिती गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मजबूत असल्याने त्यांच्या मताधिक्यात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेटाने प्रचार केल्याने भाजपकडे वळलेला काँग्रेसचा मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोघांच्या मतांच्या आघाडीत किती फरक पडेल, हे ४ जूननंतरच स्पष्ट होणार आहे.
वडील राज्याचे मंत्री, लहान बहीण जिल्हा परिषदेची अध्यक्षा, मतदारसंघातील अनेक आमदाराचा पाठिंबा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मजबूत फळी असे सर्व बाजूने पोषक वातावरण भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या बाजूने होते, तर त्यामानाने काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी नवखे आणि काँग्रेसकडे नेत्यांची व कार्यकर्त्यांचा वानवा. तरी त्यांनी जोरदार प्रचार केल्याने तालुक्यातून भाजपला गेल्यावेळी मिळालेला लीड कायम राहील की काँग्रेस मुसंडी मारेल, याबाबत नागरिकांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत.
- तळोदा तालुक्यात झालेला विकास व भविष्यात करावयाचा विकास तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपने मते मागितली.
- विकासाचा राहिलेला अनुशेष यासोबतच दहा वर्षांत विद्यमान खासदारांची कामगिरी यावर काँग्रेस व इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी मते मागितली.
- तळोदा तालुक्यातही संविधान, आरक्षण, डी-लिस्टिंग, मणिपूर हिंसाचार अशा अनेक मुद्यांवर युवकांमध्ये मत-मतांतरे दिसून आली.
- या निवडणुकीत नवमतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. त्यामुळे युवकांचे मत कोणाला पडले, हेदेखील निर्णायक ठरणार आहे.
एकूण मतदान झालेले मतदान
तळोदा शहर २६११६ १६१०६
तळोदा ग्रामीण ९८७१४ ७७१०४
तळोदा तालुका १२४८३० ९३२१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.