market committee election  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Market Committee : चुरस वाढल्याने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; राजकीय हालचालींना वेग

नंदुरबारमध्ये आमने-सामने तर शहाद्यात तिरंगी लढत रंगणार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Market Committee : जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. निवडणुकांमध्ये चुरस वाढली आहे. माघारीनंतर रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नंदुरबार बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३७ तर शहाद्याच्या १८ जागांसाठी ६५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे नंदुरबार आमने-सामने तर शहाद्यात तिरंगी लढत रंगणार आहेत. (Nandurbar Market Committee Reputation of leaders at stake due to increase in square Speed ​​up political movement news)

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे दिवसागणिक बदलत चालले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी सहकारी संघ निवडणुका कधी व्हायच्या याची फारशी माहितीही कोणाला कळत नसे, कारण या निवडणुकांमध्ये एवढी चुरस कधीच जाणवत नसे, मात्र आताची राजकीय परिस्थिती जशी बदलत आहे तशी बाजार समितीच्या निवडणुकाही चुरशीच्या ठरल्या आहेत.

नंदुरबार बाजार समितीवर मागील पाच वर्षे वगळता आतापर्यंत रघुवंशी गटाचे वर्चस्व आहे. तर शहाद्यात दीपक पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. तळोदा बाजार समितीने अत्यंत अटीतटीची चुरस असताना आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकाराने निवडणूक बिनविरोधाची पंरपरा कायम राखली आहे.

सर्वपक्षीय सदस्यांना स्थान देत सामंजस्याने निवडणूक बिनविरोध केली आहे. तर धडगाव बाजार समितीही विजय पराडके यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे. तसेच, अक्कलकुवा बाजार समितीच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. इतर जागा बिनविरोध झाल्या आहेत. नवापूर येथेही समोरासमोर लढत होत आहे.

जिल्ह्यातील सहापैकी नंदुरबार व शहादा बाजार समिती या मोठ्या उलाढालीच्या व प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. त्यात नंदुरबार बाजार समिती ही मोठी बाजार समिती मानली जाते. सध्या नंदुरबार व शहादा बाजार समितीत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

या दोन्ही बाजार समितीच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या होत आहेत. नेत्यांसाठी त्या राजकीय समीकरण ठरविणाऱ्या ठरणार आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शहाद्यात दीपक पाटील यांच्यासमोर मंत्री डॉ. गावित यांनी आव्हान उभे केले आहे. नंदुरबारमध्ये १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात रघुवंशी यांचे व डॉ. गावित यांचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच शहाद्यात दीपक पाटील यांचे उमेदवारांसमोर डॉ. गावित यांचा मार्गदर्शनाखाली एक परिवर्तन पॅनल ने आव्हान दिले आहे. त्यातच युवा नेते अभिजित पाटील यांना दोन्ही गटाकडून विश्‍वासात घेतले गेले नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून या दोन्ही गटांना आव्हान दिले आहे.

त्यामुळे शहाद्यात १८ जागांसाठी तब्बल ६५ उमेदवारी रिंगणात आहेत. येथे तिरंगी लढत रंगणार आहे. त्यामुळे येथे अधिकच चुरस वाढली आहे. या तिरंगी लढतीत दीपक पाटील यांच्यापुढे सत्ता शाबूत राखण्याचे मोठे आव्हानच उभे राहिले आहे.

मात्र त्यांचे आतापर्यंतचे वर्चस्व व सभासद आणि मतदारांवर असलेली पकड यामुळे त्यांच्याकडे झुकते माप असल्याची चर्चा आहे. मात्र शेवटी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

चौकट

मतदानाला आता चार दिवस

बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता चार दिवस उरले आहेत. शुक्रवारी (ता. २८) एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे दिवस जसे कमी होत आहेत तसे राजकीय हालचाली वाढत आहेत.

मंत्री डॉ. गावित यांचे बेरजेचे राजकारण काहीही उलथापालथ करू शकते. त्यामुळे ज्यांची सत्ता होती त्यांची सत्ता शाबूत राहिलच, हे सांगणे जाणकारांनाही कठीण वाटू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT