MP Dr. Shrikant Shinde speaking at a Shiv Sena worker meeting esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : जिल्ह्यातून विधानसभेत 2 आमदार पाठविण्यासाठी प्रयत्न : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

Nandurbar : भविष्यात शिवसेनेचे नंदुरबार जिल्ह्यातून विधानसभेत दोन आमदार पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : मुख्यमंत्री दिवसभर तळागाळातील जनतेत राहून त्यांना न्याय मिळावा यासाठी झटत आहेत. राज्यात प्रत्येत घटकाला योजनांच्या माध्यमातून लाभ मिळत आहे. भविष्यात शिवसेनेचे नंदुरबार जिल्ह्यातून विधानसभेत दोन आमदार पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. (Efforts to send 2 MLAs from district to Legislative Assembly)

या वेळी त्यांनी शहरी भागातील ‘आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत’ धडगाव-वरफड्या नगरपंचायतीला आठ कोटींच्या निधीला मंजुरी दिली. शिवसेनेचा शिंदे गटाचा आदिवासी मेळावा गुरुवारी (ता. २२) घेण्यात आला. त्याप्रसंगी खासदार डॉ. शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, निरीक्षक राजेश पाटील, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, नगराध्यक्ष धनसिंग पावरा, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, पंचायत समिती सभापती हिरा पराडके, नंदुरबार पंचायत समिती सभापती दीपमाला भिल, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील आदी उपस्थित होते.

खासदार शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की सध्या ‘ते’ गल्लीबोळात फिरून चावडीवर सभा घेत आहेत. पहिले मोठमोठ्या सभा घ्यायचे. आता ५०० लोक जमवायला त्यांना नाकीनऊ येत आहे.

संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, की सरकारकडून जी विकासकामे होत आहेत ती आपणच करीत असल्याचे जिल्ह्यात भासविले जात आहे. आदिवासी विकास विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निधी मिळत आहे.

पक्षाने ताकद दिली तर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार सहज निवडू शकतील म्हणजे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची ताकद नंदुरबार जिल्ह्यात आहे. धडगाव नगरपंचायतीत १७ पैकी १३ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. आज त्यांना बसण्यासाठी जागा नाही. सुसज्ज इमारत बनवायला पाहिजे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेले शिवसेनेचे कार्य जिल्ह्यात पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. राज्यात उद्योग विभागाच्या माध्यमातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत.

शिवसैनिकांवरील अन्याय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवू ः भुसे

जिल्ह्यातील शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यासपीठावरील मान्यवरांनी जाहीररीत्या बोलून दाखविल्या. मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बाब पोचविणार असल्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी सांगितले. ते म्हणाले, की यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ची दारे विशिष्ट लोकांसाठीच उघडी असायची.

आज आपण जर पाहिले तर रात्री तीनपर्यंत शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय झोपत नाही. वर्षा बंगल्यावर आता सामान्यातला सामान्य माणूससुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागात अनेक चांगल्या योजना राबविण्यात येत आहेत.

कोर्टात टिकणारे आरक्षण दिले

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. त्यांना कोणीही आरक्षण द्यायला तयार नव्हते; परंतु आता कमी कालावधीत संपूर्ण अभ्यास करून अडीच कोटी मराठ्यांचा सर्व्हे करून न्यायालयात टिकणारे आरक्षण महायुती शासनाने दिल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

चिमुकल्यांना हेलिकॉप्टरची सफर

दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यानंतर चिमुकली आदिवासी मुले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एकच गर्दी करीत होती. ते पाहून खासदार डॉ. शिंदे यांनी त्या चिमुकल्यांना आपल्यसोबत हेलिकॉप्टरमध्ये बसवून हवाई सफर घडवून आणली. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद मावेना असे चित्र होते. खासदार शिंदे यांच्या या दखलमुळे धडगाववासीयांमध्ये एकच चर्चा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT