Nandurbar News : एखाद्या व्यक्तीच्या कुत्र्याने चावा घेतला किंवा एखाद्यावर कुत्र्यांनी हल्ला केला अशा वार्ता अनेकदा आपल्या कानावर येतात.
मात्र तळोद्यात वेगळ्याच वार्ता कानावर पडत असून, कुत्र्यांपेक्षा बिबट्यांचे मानवांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वार्ता सध्या नागरिकांच्या कानावर पडत आहेत.
या हल्ल्यांमध्ये काहींना गंभीर दुखापत, तर काहींना जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यामुळे तळोद्यात बिबट्या-मानव संघर्ष सुरू झाला, असे म्हणावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तळोदा वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. (Nandurbar News Leopards attack humans more than dogs Talk of increased numbers in Taloda forest area)
तळोदा परिसर व तालुक्यातील मोड, बोरद, गुंजाळी, चिनोदा, रांझणी, प्रतापपूर, काजीपूर, दलेलपूर, तसेच आसपासच्या उंटावद, हातोडा परिसरातील शेतांमध्ये काही वर्षांपूर्वी बिबट्यांच्या पायांचे ठसे आढळून येत होते.
काही वर्षांनंतर शेतातील पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले करून त्यांना फस्त केल्याच्या वार्ता कानावर येऊ लागल्या. मात्र अलीकडच्या काळात तळोदा वनक्षेत्रात बिबट्यांनी मानवावर हल्ले केल्याचा वार्ता आता वारंवार ऐकू येऊ लागल्या आहेत आहेत.
तसेच अनेकदा तालुक्यातील नागरिकांना एकापेक्षा अधिक बिबट्यांचे दर्शनदेखील एकाच वेळी ठिकठिकाणी होत आहे. तालुक्यात आजकाल एखाददुसरा दिवस सोडला तर रोजच कुठे ना कुठे बिबट्याची बातमी कानावर येत आहे.
गेल्या महिनाभरात तालुक्यात बिबट्याने मानवावर हल्ले केल्याचा अनेक घटना घडल्या आहेत. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दलेलपूर शिवारात १६ ऑगस्टला दिवसा बिबट्याचा हल्ल्यात एका दहावर्षीय बालकाला जीव गमवावा लागला आहे.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रांझणीत बिबट्याचा हल्ल्यात एकजण जखमी झाल्याची घटना घडली. दलेलपूर शिवारातच २४ ऑगस्टला म्हशी चारण्यासाठी गेलेल्या एका ७५ वर्षीय वृद्धावर भरदुपारी बिबट्याने बछड्यासह हल्ला केल्याची घटना घडली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वृद्धाचा सुदैवाने म्हशींनी प्रतिकार केल्याने त्या वेळी वृद्धाचा जीव वाचला. तसेच पाच दिवसांपूर्वीदेखील एक जण दुचाकीने शेतातून घरी परत येत असताना चालत्या दुचाकीवरील व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.
याचबरोबर मागील महिन्याभरात तालुक्यात ठिकठिकाणी बिबट्यांनी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांवर हल्ले केल्याचा घटना घडल्या आहेत.
तसेच अनेकदा ठिकठिकाणी बिबट्यांनी नागरिकांना दर्शन दिल्याचा घटना घडल्या आहेत. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता तळोद्यात बिबट-मानव संघर्ष सुरू झाला असेच म्हणावे लागेल.
विशेष मोहीम राबवावी
मागील काळातील घटनांचा अंदाज घेतला तर तळोदा तालुक्यात बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. तळोदा वनक्षेत्रात असणाऱ्या बिबट्यांचा संख्येबाबत वन विभाग, नागरिक व या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.
त्यामुळे बिबट्यांची नेमकी संख्या कळण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांना उपाययोजना राबविताना अधिक सोयीचे होईल, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.