नवापूर : शहरात रविवारी (ता. १२) तीन जणांचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेच्या अमरधाममध्ये लाकूड नसल्याने नातेवाइकांची धावपळ उडाली. अंतिम विधीसाठी लाकडांचा अभाव असल्याने नातेवाइकांना बाहेरून लाकडे मागवून अंत्यसंस्कार करावा लागला.
अंत्यविधीसाठी लाकडे उपलब्ध नाहीत अशी घटना नवापूर शहरात प्रथमच घडली. अंत्ययात्रेत आलेल्या लोकांनी पालिकेच्या कारभाराविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला.नवापूर शहरात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठी पालिकेतर्फे अमरधामात ठराविक रक्कम भरून लाकडे उपलब्ध करून दिली जातात. शहरातील तीनटेंबा व धडधड्या भागात रविवारी तीन घटना घडल्या. तीन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी अमरधामात नेले असता लाकूड नसल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
लाकडे उपलब्ध नसल्याने नातेवाइकांना बाहेरून लाकडे मागवून अंतिम संस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करून देण्यास पालिका प्रशासन सपशेल असमर्थ ठरली आहे.
भाजपचे तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे, जिल्हा सरचिटणीस एजाज शेख यांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली.
नवापूरवासीयांना जिवंतपणे यातना सहन कराव्या लागतात; परंतु मरणोत्तर यातनादेखील सहन कराव्या लागत आहेत. अशा पालिकेचे जबाबदार अधिकारी कर्मचारी व जबाबदार लोकप्रतिनिधींच्या मनमानी कारभाराचा जाहीर धिक्कार व निषेध व्यक्त करीत मंगळवारपर्यंत नवापूर पालिकेने लाकडांची व्यवस्था न केल्यास आम्ही सर्व नवापूरवासीय व भारतीय जनता पक्षातर्फे मोठे जनआंदोलन करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे यांनी दिला.
''नवापूर अमरधाममध्ये आजपावेतो कधीही लाकडांचा तुटवडा झाला नाही. लाकडांची गाडी आज येणार होती. काही तांत्रिक कारणास्तव येऊ शकली नाही. उद्या नक्की गाडी येईल. आज जो प्रसंग निर्माण झाला तो कधी होऊ नये याबाबत आम्ही सर्वच दुःखी आहोत. असा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी घेऊ.'' -हेमलता पाटील, नगराध्यक्षा नवापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.