A harvester machine used for harvesting wheat. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : गव्हाच्या भुशाचा पोषक चारा कालबाह्य! चारा विकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

सकाळ वृत्तसेवा

बोरद : जनावरांसाठी जुन्या काळात ज्या वेळेस गहू काढण्यासाठी येणारे हार्वेस्टर अस्तित्वात नव्हते त्या वेळी थ्रेशर यंत्राद्वारे गहू काढणी केली जात होती. गावामध्ये गावाच्या पडीत जागेत शेतकरी खळे तयार करीत असत आणि त्या ठिकाणी गहू कापणी झाल्यानंतर ट्रॅक्टर किंवा बैलगाडीच्या माध्यमातून गहू तृणासह वाहून आणले जात असत व त्याच ठिकाणी थ्रेशर यंत्र लावून गहू काढणी होत असे.

ही गहू काढणी होत असताना त्या गव्हाच्या वाळलेल्या तृणाचे कटर म्हणजे बारीक तुकडे त्या ठिकाणी तयार होत होते आणि हेच एक मोठ्या गंजीच्या स्वरूपात गोळा होत असे. हेच कटर पुढे जाऊन पावसाळ्यात गुरंढोरांना खाऊ घातले जात असे. (Nandurbar Nutrient fodder of wheat husk expired)

जनावरे अगदी आवडीने तो खात असत. त्याला अधिक चव यावी म्हणून त्याच्यात शेतकरी भुईमूग शेंगांच्या झाडाचा पाला भेसळत असत. ज्या वेळेस गोठ्यात असलेल्या जनावरांना चारा दिला जायचा, त्या वेळेस त्याच्यावर मिठाचे तसेच गुळाचे पाणी शिंपडले जायचे, ज्यामुळे जनावरे तो चारा आवर्जून आणि आवडीने खात असत.

गव्हाच्या तृणापासून मिळणारा चारा जनावरांनाही पोषक ठरत होता. पाणी जरी या चाऱ्यावर पडले तरी तो खराब होत नव्हता म्हणून जुन्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये यासाठी वेगळी जागा आरक्षित ठेवलेली असायची आणि त्या ठिकाणी चार महिने पुरेल या हिशेबाने चारा भरून ठेवला जायचा. सकाळ, सायंकाळ हाच चारा जनावरांना खाऊ घातला जात होता.

आता गहू काढणीसाठी पंजाबकडून हार्वेस्टर यंत्रे येऊ लागल्याने हे यंत्र उभा असलेला गहू काढून देऊ लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे चार ते पाच दिवसांचे काम अवघ्या तासाभरात होऊ लागले आहे. हार्वेस्टर यंत्र फक्त ओंब्या कापत असल्यामुळे खालील तृण शेतातच उभे राहत असते. (latest marathi news)

यामुळे शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा होत नाही. शेवटी शेतकऱ्याला हे तृण जाळावे लागत आहे. जाळले नाही तर नांगरटी किंवा वखरणी करताना हे त्रासदायक ठरते. त्यामुळे शेतकरी या तृणाला जाळणेच पसंत करतो. ही क्रिया होत असताना जनावरांचा हक्काचा चारा मात्र त्यांच्यापासून हिरावला जात असतो.

आजकाल पाऊस कमी होत असल्यामुळे बऱ्याच भागात चारा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी हक्काचा चारा सोडून देत आहेत अनेक ठिकाणी शासनाकडून जनावारांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणीही पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकत नाही.

असे असले तरी काही भागात चारा या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो. शेतकऱ्यांनी गव्हाच्या तृणाचा चारा अवश्य करून ठेवावा, जेणेकरून त्यांना चाऱ्याची गरज नसेल तर इतर ठिकाणी हा चारा विकला जाऊ शकतो आणि त्याच्यातून शेतकऱ्याला चांगला नफादेखील मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT