Nandurbar Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : लोकसभेच्या रणधुमाळीत स्थानिक प्रश्नांची केवळ चर्चाच!

Nandurbar News : वघ्या काही दिवसांनी निवडणुकीला रंगही चढेल. लोकशाही पध्दतीत दर पाच वर्षांत निवडणुका अटळ आहेत. परंतु निवडणूकीनंतर सामान्य जनतेच्या काही समस्या मात्र ‘जैसे थे’च आहेत.

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारही जाहीर झाले. अवघ्या काही दिवसांनी निवडणुकीला रंगही चढेल. लोकशाही पध्दतीत दर पाच वर्षांत निवडणुका अटळ आहेत. परंतु निवडणूकीनंतर सामान्य जनतेच्या काही समस्या मात्र ‘जैसे थे’च आहेत. त्या कधी पूर्ण होतील हा खरा प्रश्न आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

'नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे ' नेहमीच होतात निवडणुका’ असे म्हणत‌ स्थानिक प्रश्नांवर प्रत्येक वेळी होणारी चर्चा यंदाही होणार, पुन्हा त्या मागे पडणार,मग प्रश्न सुटणार कधी हा प्रश्‍न मात्र निरुत्तरच राहतो. नंदुरबार मतदार संघात आजही अनेक मुलभूत सुविधांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील लहान रस्ते अजूनही दुर्लक्षित आहेत. प्रत्येक निवडणुकांच्या काळात अनेक आश्वासनाची 'बरसात' केली जाते.

दिलेली आश्वासने किती प्रामाणिकपणे पाळली जातात, हा वेगळा विषय होऊ शकतो. तथापि समस्या अनेक असल्याने आणि नंदुरबार मतदार संघाची व्याप्तीही मोठी असल्याने सर्व प्रश्नांना न्याय देणे शक्य नाही. पण काही मूलभूत सुविधांसाठी प्रयत्नही केला पाहिजे अशी अपेक्षा यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे.

साक्री विधानसभा मतदारसंघ दुर्लक्षितच

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या साक्री विधानसभा मतदारसंघात बेरोजगारी, आदिवासी मजूराचे ठरलेले स्थलांतर, बंद पडलेला साक्रीचा साखर कारखाना, म्हसदीच्या कायकंडा धरणाचा प्रश्न, तालुक्यात अनेक ठिकाणी अपूर्ण लघु प्रकल्प या अन्य अनेक समस्या गंभीर आहेत.

मोबाईल क्रांतीतून जग जवळ आले असताना अजूनही अनेक गावांत मोबाईलचे नेटवर्क नाही. राजबाईशेवाळी (ता.साक्री)हे डोंगर कुशीत वसलेले गाव नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहे. रात्री - अपरात्री दुर्घटना घडल्यास ग्रामस्थ हतबल होतात. कानाकोपऱ्यात केंद्र शासनाने मोबाईल टॉवर उभे करत संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (latest marathi news)

राजबाईशेवाळीत प्रत्येक निवडणुकीत निवडून येणाऱ्या भावी आमदार, खासदारांना मतदार हात जोडून विनंती करतात. लोकशाहीचा उत्सव झाल्यावर नवीन निवडून आलेला लोकप्रतिनिधी काम करेल अशी आशा बाळगतात. निवडणूक झाल्यावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी परंपरेने सर्व विसरून जातो हेच वास्तव आहे.

प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षाचे उमेदवार आश्वासनांचा पाऊस पाडतात. निवडून आल्यावर मात्र सर्वांना विसर पडतो हे सांगणे न लगे. विद्यमान खासदार डॉ.हीना गावित यांनी मतदारसंघात शक्य ती कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला आहे.आश्वासनेही भरमसाठ दिली आहेत.बहूतेक आश्वासने हवेत विरल्याची चर्चा आज दबक्या आवाजात केली जात आहे.

‌‌स्थंलातराचा प्रश्न जुनाच !

साक्री तालुक्यात दरवर्षी रोजगारासाठी अल्प भूधारक, आदिवासी मजुरांचे स्थलांतर ठरलेलेच. स्थानिक ठिकाणी पुरेसा रोजगार असताना मजूर स्थलांतर का करतात, याचा साधा विचार ना शासकीय यंत्रणा करते, ना लोकप्रतिनिधी. समन्वयातून प्रामाणिक प्रयत्न केल्यास स्थलांतर थांबविणे अवघड नाही.

स्थंलातरीत मजूरांची आठवण केवळ मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हमखास केली जाते. मतदान करण्यासाठी मजूरांना फिल्डींग लावत परराज्यातून आणलेही जाते. निवडून आल्यावर मात्र त्यांचा विसर पडतो. यंदा दुष्काळाची दाहकता अधिक असल्याने स्थानिक ठिकाणी शेतमजूरांना रोजगाराची भ्रांत आहे.

निवडणुकीसाठी अजून फारसा रंग चढला नसला तरी आतील हालचाली, भेटी-गाठी, संपर्क मेळावे घेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. या निवडणूकीत मतदार कोणाला झुकते माप देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विधानसभा, लोकसभा मतदारसंघ राखीवच

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ स्थापनेपासून राखीव आहे. साक्री विधानसभा मतदारसंघ १९६२ पासून केवळ दोन वेळा खुला होता. त्यानंतर मात्र मतदार संघ सलग अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.१९६२ पासून एकवेळा कम्युनिस्ट पक्षाचा, सात वेळा काँग्रेसचा, तीन वेळा भाजपचा, एक वेळा रिपब्लिकन पार्टीचा.

एक वेळा अपक्ष व १९५२ ला शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार शंकरराव बेडसे निवडून आले आहेत. १९६२ मध्ये मतदार संघ प्रथमच राखीव झाला.त्यावेळी पहिले आदिवासी आमदार म्हणून गोकुळ रुपला गावित यांना संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT