While welcoming Prime Minister Narendra Modi by gifting a replica of Lord Birsa Munda, Minister Dr. Vijayakumar Gavit, Dr. Hina Gavit et al. esakal
उत्तर महाराष्ट्र

PM Modi Nandurbar Daura : आदिवासी शहिदांचे म्युझियम बनवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा

PM Modi Nandurbar Daura : आम्ही शबरी पूजक आहोत परंतु काँग्रेसने कधीही आदिवासींच्या श्रद्धास्थानांचा सन्मान केला नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक आदिवासी हुतात्मा बनले असताना केवळ काँग्रेसच्या बड्या घराण्यांचा इतिहास सांगत राहिले म्हणून आम्ही आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि वीर पुरुषांच्या आठवणी सांगणाऱ्या भव्य म्युझियमची उभारणी करणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. (Nandurbar PM Modi Daura news)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.१०) नंदुरबार येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेत ते बोलत होते. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्यासाठी मोदी हे प्रचाराला आले होते.

त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही ते नंदुरबार येथे आले. अक्षयतृतीयेचा दिवस असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते. अक्षयतृतीयेचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिराणी भाषेतून शुभेच्छा देत भाषणाचा प्रारंभ केला.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासींचे कुलदैवत देव मोगरा मातेला नमन करून आणि जननायकांचे स्मरण करून अभिवादन केले त्याचबरोबर आखाजी म्हणजे अक्षयतृतीयेच्या व परशुराम जयंतीच्या देखील शुभेच्छा दिल्या. अक्षयतृतीयेच्या दिवशी केलेले कार्य अक्षय ठरते आणि आज एवढे मोठी जनता आशीर्वाद द्यायला जमली याचा अर्थ डॉ. हिना गावित यांच्यासह आम्हा सर्वांना जनतेचा अक्षय आशीर्वाद लाभला, असे याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले. (Latest marathi news)

डॉ. हिना गावित यांचा विशेष उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या मुलीची आम्हाला खूप मदत होते. ती संसदेत विरोधकांचे चांगलेच छक्के सोडवते. गरिबांच्या सुखदुःखाची ती खरी साथीदार आहे. आधी मतदान मग जलपान हे लक्षात घेऊन नंदुरबार मतदारसंघातील सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मत द्यावे, असेही जाहीर आवाहन मोदी यांनी याप्रसंगी केले.

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विकास कार्याला लक्षात घेऊन मतदारांनी डॉ. हिना गावित यांच्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहन केले. सभा संपल्यावर व्यासपीठावरून उतरताना पंतप्रधान मोदी यांना उमेदवार डॉ. हिना गावित यांनी झुकून नमस्कार केला, त्याप्रसंगी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून मोदी यांनी आशीर्वाद दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT