PM Narendra Modi Nandurbar Daura : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर व बाहेरील राज्य महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गात एक दिवसासाठी अंशतः बदल करण्यात आला आहे. वाहनधारकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे. (Nandurbar PM Narendra Modi Daura news)
नंदुरबार लोकसभेतील भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी (ता. १०) दोंडाईचा रस्त्यावरील चौपाळे शिवारात स्वामी समर्थ केंद्र परिसरातील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानांना व्हीआयपी सुरक्षाव्यवस्था आहे, तसेच सभेसाठी मतदारसंघातील समाविष्ट विविध तालुक्यांतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
त्यासाठी नागरिक वाहनांद्वारे येतील. वाहनांची संख्या व नागरिकांची गर्दी यामुळे शहरात येणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नंदुरबार ते दोंडाईचा या मार्गासह शहराकडे येणाऱ्या काही मार्गांवरील वाहतुकीच्या मार्गात अंशतः सभेच्या काळापर्यंत बदल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
त्याळे वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. ती अशी ः दोंडाईचाकडून येणारी लहान चारचाकी वाहने, बस वावद येथून उमर्देमार्गे नंदुरबार शहरात उड्डाणपुलाखालून येतील. दोंडाईचाकडून येणारी अवजड वाहने दोंडाईचा-सारंगखेडामार्गे शहादा-प्रकाशाकडे जातील.
नवापूर व साक्रीकडून येणारी वाहने ढेकवदमार्गे पाचोराबारी-करणखेडा, वाका चार रस्तामार्गे प्रकाशा-शहादाहून धुळ्याकडे जातील. करण चौफुलीकडून येणारी वाहने उड्डाणपुलाखालून उमर्दे-वावदमार्गे दोंडाईचा-धुळ्याकडे जातील.
शहादा-प्रकाशाकडून येणारी वाहने वाका चार रस्ता, करणखेडा-पाचोराबारी-ढेकवदमार्गे साक्री-नवापूरकडे जातील. हा बदल १० मेस सकाळी सहापासून, तर मोदी यांची सभा संपेपर्यंत लागू राहील. वाहनधारकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.