esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Political News: निवडणूक लोकसभेची, आडाखे मात्र पालिकेचे! तळोदा येथे पक्षांना मिळालेल्या मतांवरून चर्चांना उधाण

Nandurbar News : डिसेंबर २०२२ मध्येच तळोदा पालिकेची मुदत संपली आहे. मात्र निवडणूक अजूनही झालेली नाही. त्यात आता लोकसभा निवडणूक झाल्याने शहरात राजकीय पक्षांना मिळालेली मते सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

फुंदीलाल माळी

तळोदा : शहरात लोकसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतदानावरून पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आडाखे बांधायला सुरवात केली आहे. त्यात शहरात मतदान केंद्रनिहाय मतांची गोळाबेरीज सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे डिसेंबर २०२२ मध्येच तळोदा पालिकेची मुदत संपली आहे. मात्र निवडणूक अजूनही झालेली नाही. त्यात आता लोकसभा निवडणूक झाल्याने शहरात राजकीय पक्षांना मिळालेली मते सध्या चर्चेचा विषय झाला आहे. (Nandurbar Lok Sabha elections but municipality planning)

लोकसभा निवडणुकीत तळोदा शहरात एकूण २६ हजार ११६ मतदारांची नोंद होती. त्यामुळे मतदानासाठी शहरात एकूण २४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. त्यात १६ हजार १०७ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यातील नऊ हजार १२८ मते डॉ. हीना गावित यांना मिळाली, तर ॲड. गोवाल पाडवी यांना सहा हजार ५८३ मते मतदारांनी दिली.

शहरातील २४ मतदान केंद्रांवर १४ ठिकाणी डॉ. हीना गावित म्हणजेच भाजपला मताधिक्य मिळाले, तर १० मतदान केंद्रांवर काँग्रेस अर्थात ॲड. गोवाल पाडवी यांची आघाडी राहिली. त्यातही दोन केंद्रांवर काँग्रेसला शंभरीदेखील गाठता आली नाही. त्यामुळे शहरात भाजपला एकूण दोन हजार ५४५ एवढे मताधिक्य मिळाले. मात्र हे मताधिक्य २०१९ लोकसभा निवडणुकीतील सुमारे चार हजार ५०० मतांपेक्षा घटले आहे.

असे असले तरी शहरातून भाजपला मताधिक्य मिळाल्याचे समाधान भाजपच्या कार्यकर्त्यांना नक्कीच असणार. त्यात शहरातून मिळालेली ही मतदानाची आकडेवारी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. कारण येथील पालिकेची निवडणूक मुदत संपल्यावरही झालेली नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी अथवा त्यानंतर निवडणूक झालीच तर या आकडेवारीवरून राजकीय पक्षांचा कार्यकर्त्यांनी आडाखे बांधण्यास सुरवात केली आहे. (latest marathi news)

शहरात लोकसभा निवडणुकीत आमदार राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, माजी नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, रामानंद ठाकरे, योगेश चौधरी, पंकज राणे, शिरीष माळी, कैलास चौधरी, जगदीश परदेशी यांनी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी किल्ला लढविला.

महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी, युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी, माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, शहराध्यक्ष योगेश मराठे, शिवसेना उबाठा गटाचे शहराध्यक्ष जितेंद्र दुबे, उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार, सूरज माळी यांनी व काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रचार केला. आता निकालाची आकडेवारी जाहीर झाल्याने पालिका निवडणुकीची चर्चादेखील सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र व वॉर्डनिहाय मिळालेल्या मतांकडे वळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT