Effluent discharged from Bhagatwadi and area in front of Public Works Department in Rangavali river. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शहराचे सांडपाणी थेट रंगावली नदीपात्रात! प्रक्रिया करून पाणी पुनर्वापरासाठी वापरल्यास प्रदूषण थांबणार

Nandurbar News : सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणले तर खूप मोठी समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा शहरवासीयांची आहे.

विनायक सूर्यवंशी

नवापूर : शहरातील असो वा ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, पथदीप आणि सर्वांत महत्त्वाचे पिण्याचे पाणी शुद्ध मिळाले पाहिजे. मात्र जबाबदार घटक, पालिका प्रशासन जर शहराचे सांडपाणी थेट रंगावली नदीपात्रात सोडत असेल आणि त्याच नदीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असेल तर नागरिकांच्या आरोग्याबाबत काय अपेक्षा कराव्यात. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणले तर खूप मोठी समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा शहरवासीयांची आहे. (Nandurbar rangavali river water treated used for reuse pollution will stop)

शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी

सांडपाण्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र यात सुधारणा झाली नाही. आता तर दीड वर्षापासून पालिकेवर प्रशासकीय यंत्रणा कारभार करीत आहे. यात राजकीय हस्तक्षेपसुद्धा नाही. वास्तविक नागरिकांच्या हिताच्या आणि आरोग्यासाठी चांगली निर्णयात्मक विकासकामे होऊ शकतात.

मात्र नवापूरवासीयांचे दुर्भाग्य म्हणावे अजून काय? कुठल्याही प्रकारची कामे होताना दिसत नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून थेट नदीपात्रात जाणाऱ्या सांडपाण्याला अडवून जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे.

सांडपाण्यावर प्रक्रिया करावी

नवापूर शहरातील सांडपाणी गटारीद्वारे थेट रंगावली नदीत सोडले आहे. लहान चिंचपाडा, लाखाणी पार्क, देवळफळी या वसाहतीचे सांडपाणी थेट नदीपात्रात केटीवेअरजवळच जमा होते. याच भागात नवापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. शहरातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी थेट नदीत सोडले आहे.

भगतवाडी, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वस्तिक डाळ मिल, अमरधाम या भागातून संपूर्ण शहराचे सांडपाणी गटारीद्वारे नदीपात्रात वाहत्या पाण्यात मिसळते. या सांडपाण्यामुळे नदीचे पाणी दूषित होते. याच पाण्याचा शहराला आणि पुढील गावांना पाणीपुरवठा म्हणून होतो. वास्तविक शहरातील वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी वापरले तर नदीचे पाणी दूषित होणार नाही. (latest marathi news)

...तर शहराच्या सौंर्दयात भर

प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे, असे म्हणून कसे चालेल? आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. कुठूनतरी चांगल्या कामाला सुरवात झाली पाहिजे. सकारात्मक विचार करून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट राबविला तर या पाण्याचा वापर शेती, पारसबाग, पालिका गार्डन अशा ठिकाणी होऊ शकतो. शहराला शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकतो, नदीपात्र स्वच्छ होईल. दूषित पाण्यापासून उत्पन्न होणाऱ्या रोगराईवर अंकुश येईल. रिकाम्या जागेवर या पाण्याचा वापर करून हिरवाई फुलू शकते, शहराच्या सौंदर्यात भर पडेल.

पाणी किती शुद्ध संशोधनाचा विषय

नवापूर शहरातून रंगावली नदी वाहते. पूर्वीपासून बारमाही वाहणाऱ्या रंगावली नदीवर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. रंगावली नदीच्या उगमस्थानापासून अनेक गावे, ग्रामस्थ आणि त्यांची शेती या पाण्यावर अवलंबून आहे. नवापूर शहरासाठी तर जीवनदायिनी आहे.

गेल्या दोन दशकांपासून रंगावली नदीवर ठिकठिकाणी केटीवेअर बंधारे, बंधारे बांधल्यामुळे उन्हाळ्यात नदी काहीअंशी कोरडी पडते. नवापूर शहराला पाणीपुरवठा याच रंगावली नदीपात्रातील विहिरीमार्फत होतो. त्या विहिरींचे पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यांत सोडले जाते.

पूर्वी या पाण्याच्या टाकीत जलशुद्धीकरण करणारी पावडर टाकून सरळ नळाद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असे. आता जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र पाणी किती शुद्ध मिळते हा संशोधनाचा विषय आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या असल्याने शुद्ध पाणी अशुद्ध होते. शहराचे सांडपाणी थेट नदीपात्रात न सोडता त्यावर योग्य ती प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू झाला पाहिजे. पिण्याच्या पाण्यासाठी, नदी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबविते त्याचा लाभ पालिकेने घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT