Constituency office bearers and activists participation in the Shakti rally. In the second photo, Dr. Heena gavit while filing nomination with District Election Officer Manisha Khatri.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबारमध्ये महायुतीतर्फे शक्तीप्रदर्शन

Nandurbar News : सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजप व महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी सोमवारी जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : हजारोच्या संख्येने आलेल्या समर्थकांच्या साक्षीने शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत महायुती मधील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजप व महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी सोमवारी (ता.२२) जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. (Nandurbar Show of strength by Mahayuti in Nandurbar)

नंदुरबार लोकसभा मतदार संघातील आठही तालुक्यातील गावागावातील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा घडल्या जात असतानाच प्रत्यक्ष रॅली प्रसंगी मात्र खासदार डॉ. हीना गावित यांच्यासाठी सर्वपक्षीय नेते आवर्जून उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

डॉ. हीना गावित यांची रॅली सकाळी अकराला त्यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली. रॅलीत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, आमदार काशिराम पावरा, ज्येष्ठ नेते भूपेशभाई पटेल, आमदार राजेश पाडवी, शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित.

विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजप लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल. (latest marathi news)

डॉ. विक्रांत मोरे, डॉ. कांतीलाल टाटीया, डॉ. शशिकांत वाणी, शिवाजी दहिते, जि.प.सदस्य भरत गावित, संगीता गावित, सुरेशराव सोनवणे, चंद्रजित पाटील व अन्य मान्यवर रॅलीच्या अग्रभागी होते. महायुतीमधील सर्व मित्र पक्षांचे नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, शहादा, शिरपूर आणि साक्री या आठही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

माझी ऊर्जा आणखी वाढली : डॉ. हीना गावित

दरम्यान यावेळी बोलताना डॉ. हीना गावित यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक उमेदवारी दाखल करण्यासाठी सोबतीने आले हे पाहून माझी ऊर्जा वाढली आहे. माझ्या कामावर लोकांनी दाखवलेल्या या विश्वासाच्या बळावर मी पुन्हा उमेदवारी दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT