Sitaram Maharaj leaving for Narmada Parikrama by bowing down. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : रखरखत्या उन्हात उघड्या अंगाने दंडवत परिक्रमा; उत्तराखंड येथील तरुण सीताराम महाराज यांची तपश्‍चर्या

सम्राट महाजन

Nandurbar News : अध्यात्म्याला दुर्दम्य इच्छाशक्ती, मानसिक कणखरपणाची साथ लाभली तर असाध्यही साध्य होऊ शकते. याचा प्रत्यय नर्मदा परिक्रमेसाठी निघालेल्या सीताराम महाराज यांच्याकडे पाहून येत आहे. तापमानाचा पारा चाळिशी पार केलेली असताना व जमीन निखाऱ्यासारखी तप्त झालेली असताना, उघड्या अंगाने दंडवत करत सीताराम महाराज नर्मदा परिक्रमा करीत आहेत. त्यांची ही कठोर तपश्चर्या व साधना जागोजागी कुतूहलाच्या विषय ठरत आहे. ( Sitaram Maharaj is circumambulating Narmada with his bare body bowing down )

नर्मदा परिक्रमा करणारे काही भक्त परिक्रमा पदयात्रेने पूर्ण करतात तर काही भक्त चक्क लोटांगण घालत किंवा दंडवत करीत किंवा आणखीन वेगळा मार्ग निवडत पूर्ण करतात. असेच एक भक्त दीड वर्षापासून दंडवत करीत नर्मदेच्या परिक्रमेसाठी निघाले आहेत. मूळचे उत्तराखंड येथील रहिवासी सीताराम महाराज (वय २५) यांनी ५ ऑक्टोंबर २०२२ पासून नर्मदेचे उगमस्थान अमरकंटक येथून परिक्रमेला प्रारंभ केला.

मागील दीड वर्षापासून ते दररोज साधारणतः पाच किलोमीटर परिक्रमाच्या मार्गावर दंडवत घालत पुढे जात आहेत. सकाळी साडेपाच वाजेपासून ते आपल्या परिक्रमेला सुरवात करतात. उघड्या अंगाने दररोज पाच किलोमीटरचे अंतर ते दंडवत घालत पुढे सरकत आहेत. मागील दीड वर्षात त्यांनी ऊन-वारा, पाऊस-थंडी सर्व सहन करून आपली तपस्या टिकवून ठेवली आहे.

कठोर तपस्येसोबतच सीताराम महाराज हे सकाळपासूनच मौन व्रत धारण करतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ते आपले मौन व्रत सोडतात. ते दुपारी केवळ फलाहार घेतात आणि एकच वेळ संध्याकाळी जेवण करतात. संध्याकाळी विश्रामाच्या ठिकाणी ते पर्यावरण संरक्षण, नद्यांचे प्रदूषण या संदर्भात जनजागृतीही करीत आहेत. (latest marathi news)

नुकतेच ते आमलाड (ता. तळोदा) मार्गे दंडवत करीत नर्मदा परिक्रमेला पुढे मार्गस्थ झाले. त्यांना येथील सेवेकरी योगेश चव्हाण, मुकुंद वाघ, अनिल पवार आदींनी सोबत चालत सेवा दिली. त्यांची ही कठोर तपस्या पंचक्रोशीतील नागरिकांसाठी कुतूहलाचा व कौतुकाचा विषय ठरत आहे.

''नर्मदा परिक्रमा करून नदी किनाऱ्यावरील तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने मानवाला पुण्य मिळते. मठाधिशांच्या आज्ञेने नर्मदा परिक्रमेला सुरवात केली आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व नद्यांचे प्रदूषण यासंबंधी प्रबोधन व्हावे, हा उद्देशही नर्मदा परिक्रमा मागील आहे.''- सीताराम महाराज.

दृढनिश्चय व आत्मविश्वास

नर्मदा परिक्रमेचे अंतर शंभर-दीडशे नव्हे तर तब्बल सोळाशे किलोमीटर आहे. पण अध्यात्मावर विश्वास असल्याने सीताराम महाराज अंतराचा विचार न करता, नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाप्रकारे दंडवत प्रणाम करीत परिक्रमा पूर्ण करायला अद्याप त्यांना किमान दोन वर्ष तरी लागू शकतात. मात्र त्यांचा दृढनिश्चय, आत्मविश्वास पाहता ते आपले स्वप्नं नक्कीच पूर्ण करतील यात शंकाच नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT