Burnt motorcycle & stone-brick block lying in the street in Maliwada area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Riot News : नंदुरबार शहरात अफवेमुळे दोन गटांत दगडफेक! पोलिसांसह अनेक जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Riot News : ईदनिमित्त निघालेल्या जुलूसदरम्यान काही समाजकंटकांकडून दगडफेक झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्या वेळी कडक पोलिस बंदोबस्त तैनात असताना दोन गटांत दगडफेक होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले.

या वेळी दोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेकीत पोलिस कर्मचाऱ्यांसह काही जण जखमी झाले. तसेच पोलिस वाहन, दोन दुचाकींचीही जाळपोळ करण्यात आली. घटनास्थळी अक्षरशः दगड-विटांचा खच पडलेला दिसून आला. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या.

सुमारे दीड तास दगडफेक सुरूच होती. मात्र, पोलिसांनी ती आटोक्यात आणली. जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. स्वतः घटनास्थळी होते. त्यांनी अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. (Stone pelting in two groups due to rumor in city)

नंदुरबार शहरात ईदनिमित्त गुरुवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास जुलूस काढण्यात आला होता. त्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इलाही चौक परिसरातून हा जुलूस माळीवाडा परिसरात महात्मा फुले पुतळा परिसरात आला. त्या वेळी जुलूसमध्ये कोणी तरी दगडफेक झाल्याची आरोळी मारली.

मात्र, पोलिस तेथे तैनात होते. तसे काहीही नव्हते. मात्र, जुलूसमधील लोकांमध्ये चलबिचल झाली. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन करीत जुलूस थांबविला. मात्र, या वेळी त्या परिसरात जोरदार दगडफेक सुरू झाली. दगडफेक कोणी केली हे पोलिसांच्याही लक्षात आले नाही.

पाहता पाहता दोन गटांत एकमेकांना प्रतिकार करण्यासाठी दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. दगडफेक सुमारे दोन तास सुरू होती. पोलिस शांततेचे आवाहन करीत होते. मात्र, या वेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात काही पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक अतीश कांबळे, पोलिस उपअधीक्षक संजय महाजन यांच्यासह पोलिस ताफा तेथे दाखल झाला.

दंगल आटोक्यात आणण्यासाठी अखेर अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या. त्या वेळी जमाव पांगला. या वेळी माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानाला आग लावण्यात आली. तीन घरांचे नुकसान झाले. तर तीन दुचाकी व एक चारचाकी वाहनाचे नुकसान करण्यात आले आहे. पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले. (latest marathi news)

इलाही चौक आणि मच्छीबाजारात पडसाद

या घटनेचे पडसाद शहरातील इलाही चौक आणि मच्छीबाजारातही उमटले. तेथेही दगडफेक करण्यात आली. एकीकडे जमाव पांगविला, तर दुसरीकडे त्याचे पडसाद उमटल्याने पोलिसांचीही दमछाक झाली. तेथेही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तशीच परिस्थिती नवनाथ टेकडी परिसरातही होती. तेथेही अश्रुधुराच्या कांड्या फोडून जमावाला नियंत्रित करण्यात आले.

बाजारपेठेत शुकशुकाट

घटनेची माहिती शहरात पसरताच शाळा लवकर सोडण्यात आल्या, तसेच बाजारपेठ पूर्णपणे बंद झाली. व्यापारी-व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. त्यामुळे नंदुरबार शहरातील अन्य भागातील बाजारपेठेतही शुकशुकाट होता.

"घटना नियंत्रणात आली आहे. पोलिस यंत्रणा त्यांचे काम करीत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अथवा मौखिक अफवा कोणीही पसरून शांततेचा भंग करू नये. सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिस सर्व संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करतील. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये."-श्रवण दत्त एस., जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT