QR code plates installed on properties in Taloda city. esakal
उत्तर महाराष्ट्र

Swachh Maharashtra Abhiyan: कचरा संकलनासाठी आता ‘QR कोड’! तळोदा पालिका हद्दीतील सर्व मालमत्तांसाठी अंमलबजावणी

Nandurbar News : शहरातील कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचरा संकलन केल्यानंतर हे कोड स्कॅन करावे लागणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील मालमत्तांवर तसेच ओला व सुका कचरा साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबिनवर विशिष्ट कोड लावण्याचे काम सुरू आहे. दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी शहरात आयसीटी प्रणाली कार्यरत करण्यासाठी हे विशिष्ट कोड लावले जात आहेत.

त्यामुळे शहरातील कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचरा संकलन केल्यानंतर हे कोड स्कॅन करावे लागणार आहेत. त्यामुळे कोणत्या भागातील कचरा कधी व केव्हा उचलला गेला याची माहिती तातडीने मिळणार आहे. त्यामुळे कचरा संकलनात नियमितता येईल, अशी अपेक्षा आहे. (nandurbar Swachh Maharashtra Abhiyan QR Code for Garbage Collection)

अस्वच्छता व कचरा यामुळे रोगराई व दुर्गंधी तसेच प्रदूषणयुक्त वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे मानवाचे आरोग्य तसेच सामाजिक जीवनावर परिणाम होतो. या समस्यांच्या समाधानाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे नावीन्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शहरातील मालमत्तांवर अर्थात घरोघरी विशिष्ट कोड अर्थात क्यूआर कोडची प्लेट लावली जात आहे. या प्लेटमुळे कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांद्वारे कचरा केव्हा संकलित करण्यात आला हे दिसणार आहे.

दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठीदेखील हे क्यूआर कोड महत्त्वाचे असणार आहेत. कारण कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे कोड स्कॅन करावे लागणार आहेत. शहरात सध्या के. एस. असोसिएट्स या नागपूरस्थित संस्थेमार्फत घरे, धार्मिक स्थळे, बँक, शाळा अशा सर्व मालमत्तांना क्यूआर कोड असलेली प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. कचरा संकलनाची माहिती ऑनलाइन करण्याचा हेतू यामागे आहे.

सध्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व शहादा पालिकेंतर्गत मालमत्तांना क्यूआर कोड लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता तळोदा पालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना हे कोड लावले जात असल्याचे के. एस. असोसिएट्सचे जनसंपर्क अधिकारी हर्शल देसाई यांनी सांगितले. यात शहरातील नागरिकांकडून माहिती भरून क्यूआर कोड असलेल्या प्लेट लावण्याचे काम अश्विन भोई, जितेंद्र मराठे आदी कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे कचरा संकलनात नियमितता येऊन स्वच्छता ठेवणे सोपे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. (latest marathi news)

उलटसुलट चर्चा रंगल्या

सध्या तळोदा शहरात कचरा संकलन करण्याचा ठेका दोन वर्षांपासून संपल्याचे समजते. त्यात कचरा संकलन करणारी वाहने नियमित येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कचरा संकलन करणारी वाहने नेहमी नादुरुस्त असतात. केवळ एखाददुसरे वाहन सुस्थितीत असते. नवीन वसाहतीत तर कचरा संकलनासाठी वाहन येत नसल्याची नेहमीची ओरड आहे.

दुसरीकडे नागरिकही कचरा व्यवस्थापन करण्याचा सूचना जनजागृती करूनही पाळत नसल्याचा अनुभव येतो. त्यामुळे आता कचरा संकलनाची माहिती ऑनलाइन गोळा करण्यासाठी लावण्यात येणारे क्यूआर कोड कसे व किती परिणामकारक ठरतात याबाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT