तळोदा : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी १५ जुलैपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. यात नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे तळोदा येथील महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदविला. कर्मचारी आंदोलनात असल्याने महसूल कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याचे पाहावयास मिळाले. महसूल कार्यालयात कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. (Ladki Bahin Yojana candidates upset for not getting certificates)
यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील विविध दाखल्यांसाठी आलेल्या महिलांचा हिरमोड होऊन, आल्या पावली मागे फिरावे लागले. शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले आजही मिळणार नाहीत म्हणून विद्यार्थी कमालीचे नाराज झाले. ग्रामीण भागातील महिला व नागरिकांची महसूल ठिकाणी काम न झाल्याने रिकाम्या हाती परत जाताना चेहऱ्यावर नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले.
नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आपल्यामार्फत शासनस्तरावर पाठपुरावा करणे, मृत महसूल कर्मचारी यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर नियुक्ती देणे, महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यलयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जागा उपलब्ध करून द्यावी.
नंदुरबार जिल्ह्यात अव्वल कारकून संवर्गाची बरीच पदे रिक्त आहेत. केवळ पुरवठा विभागाची पदे भरली जात असल्याचे कारण दिले जात आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असतानाही शहादा तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीपासून वंचित ठेवले जात आहे. (latest marathi news)
मंडळ अधिकारी व अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांचे अदला बदली धोरण कायम ठेवावे. महसूल सहाय्यक व अव्वल कारकून यांच्यावर सुरू असलेल्या चौकश्या नियमात व मुदतीत निकाली काढण्यात याव्यात. जिल्ह्यातील बरीच पदे रिक्त असल्याने महसूल सहाय्यक व अव्वल कारकून कामाचा अतिरिक्त ताण वाढत असल्याने रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत.
तालुकास्तरावर महसूल कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने जिल्हानिर्मितीपासून अद्याप न बांधल्याबाबत, तसेच जिल्हास्तरावर शासकीय निवासस्थाने असून, त्यांची डागडुज्जी व इतर सुविधा न मिळाल्याबाबत, २०२४ या वर्षात बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदली होण्याबाबत अशा विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
वर्ग ३ व ४ च्या मागण्या प्रलंबित
जिल्ह्यातील महसूल कर्मचारी वर्ग ३ व ४ च्या विविध मागण्या जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, गृहकर्ज/भविष्यनिर्वाह निधी देयके, जिल्हाधिकारी कार्यालयातील, लेखाधिकारी नरेंद्र भोपे यांच्यामार्फत अनावश्यक व नियमबाह्य त्रुटी कर्मचाऱ्यांना वेळेत व हक्काच्या लाभापासून वंचित ठेवत आहेत. त्यांची चौकशी करून इतरत्र जिल्हा बदली करण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.