Vidhan Sabha Election esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Vidhan Sabha Election 2024: नवापुरात तिन्ही उमेदवारांमध्येच रंगणार लढत; उमेदवार तेच, मात्र पक्ष व चिन्ह बदलण्याची शक्यता

धनराज माळी

नंदुरबार : नवापूर विधानसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते सुरूपसिंग नाईक यांचा पांरपरिक बालेकिल्ला मानला जातो. एक पंचवार्षिक अपवाद वगळता तो आजही शाबूत आहे. मात्र, येथेही घराणेशाही सुरू आहे. एकाच कुटुंबातील राजकीय परंपरा सुरू असल्याने जनता आता दबक्या आवाजात बोलू लागू लागली आहे. असे असले तरी २०१९ मध्ये असलेले प्रमुख तीन उमेदवारच पुन्हा आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असणार असल्याने येथे उमेदवारांमध्ये फारसा बदल होणार नसल्याचे चित्र आहे. (Vidhan Sabha Election In Navapur fight will be fought between all three candidates )

फक्त पक्ष व चिन्ह बदलू शकते, इतकाच काय तो फरक राहील. नवापूर विधानसभा मतदारसंघात नंदुरबार तालुक्यातील पश्‍चिम व दक्षिण पट्ट्यातील गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात २०१४ ची निवडणूक अपवाद वगळता कॉंग्रेसचे नेते तथा माजीमंत्री सुरूपसिंग नाईक यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. देशपातळीवर वजन असलेल्या श्री. नाईक यांचा पराभव २०१४ मध्ये मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांनी समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवून केला होता.

त्यानंतर पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत माजीमंत्री श्री. नाईक यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक आमदार झाले. त्यामुळे आजमितीस कॉंग्रेसची सत्ता आहे. कौटुंबिक राजकारण सुरू असताना २०१४ मध्ये तत्कालीन खासदार दिवंगत माणिकराव गावित यांचाही पराभव डॉ. हिना गावित यांनी करत भाजपचे वर्चस्व सिद्ध केले होते. त्यानंतर माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनाही राजकारणात जागा राहिली नाही. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना चांगले काम केले. मात्र, त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होत भाजपमध्ये प्रवेश केला. (latest marathi news)

भाजप प्रवेशानंतर किमान विधानसभेची संधी मिळेल, असे त्यांचे गणित होते. ते खरेही ठरले. २०१९ मध्ये कॉंग्रेसचे अनेक वर्ष मित्र असलेले शिरीषकुमार नाईक यांच्यासमोर भरत गावित यांनी भाजपतर्फे उमेदवारी केली. तर मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांनीही अपक्ष उमेदवारी केली होती. मात्र, कॉंग्रेसचे शिरीष नाईक विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकाची मते शरद गावित यांना मिळाली होती. भरत गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. परंतु, मागील पाच वर्षात नवापूर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मतदारसंघात विकासकामांवर चांगला भर दिला आहे.

उमेदवारीसाठी पक्षांतर

सध्या राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची महायुती आहे. त्यामुळे नवापूर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी (अजित पवार गट) सुटण्याची शक्यता आहे. तशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. त्यातच शरद गावित उमेदवारी करणार आहेत. त्यामुळे मंत्री डॉ. गावित हे त्यांचे बंधूंना मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजपला ही जागा सुटली तरी भरत गावित यांना जिल्ह्यातील भाजप नेत्यांची मदत होईलच, असे वाटत नाही.

साहजिकच भरत गावित यांनी सावध पवित्रा घेत भाजपमध्ये सध्या न्युट्रल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांशी संबध वाढविले आहेत. अधिकृत प्रवेश केला नसला तरी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत कार्यक्रमात दिसून येतात. त्यामुळे उमेदवारीसाठी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जात असल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा श्री. गावित यांना होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

Paris Olympic 2024 पदक विजेत्या Manu Bhaker चा रॅम्प वॉक

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Latest Marathi News Live Updates: अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील 'जलसा' निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या

SCROLL FOR NEXT