Congress party workers cheering for victory. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nawapur Assembly Constituency : काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध

विनायक सूर्यवंशी

Nawapur Assembly Constituency : राजकारण व राजकीय वातावरणात वाढलेले मात्र स्वतः राजकारणात सक्रिय नसलेले तरी दोन टर्म खासदाराला आव्हान देत खासदारकी मिळवत ॲड. गोवाल पाडवी यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली. लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाला पुन्हा काँग्रेस पक्षाचे वैभव प्राप्त करून दिले, तर खासदार डॉ. हीना गावित यांचे सलग तिसऱ्या वेळी खासदारकी मिळवून मंत्री होण्याचे स्वप्न मतदारांनी भंग केले. विधानसभा नवापूर मतदारसंघाने ॲड. पाडवी यांना भरघोस मतदान करून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. ()

राजकारण असो की वैयक्तिक जीवन, अतिआत्मविश्वास आणि कर्तव्यात केलेली कसूर माणसाला दिवसा तारे दाखविल्याशिवाय राहत नाही. विधानसभा नवापूर मतदारसंघात ॲड. गोवाल पाडवी यांना भरघोस मतांचा प्रतिसाद देऊन माजी मंत्री टॉप टेन खासदार माणिकराव गावित यांना आदरांजली वाहिली. खासदार डॉ. हीना गावित यांनी नवापूर तालुक्याकडे केलेले दुर्लक्ष त्यांच्या अंगी आले. डॉ. गावित खासदार झाल्यापासून नवापूर तालुका पोरका झाला होता.

तालुक्याला नेहमीच सापत्न वागणूक मिळत होती. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मतदारसंघात व जिल्ह्यात राजकीय सत्तेसाठी आपल्या परिवाराला आधी प्राधान्य दिल्याने मतदारांनी मतपेटीतून आपला राग व्यक्त केला आहे. निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नवापूर तालुक्यातून माजी मंत्री सुरूपसिंग नाईक किंवा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वर्गीय माणिकराव गावित परिवारातून उमेदवारी मिळाली असती तर अधिक मताधिक्य मिळाले असते यात दुमत नाही.

या वेळी काँग्रेस पक्षाला मतदारसंघात सकारात्मक वातावरण होते. सुरवातीला अगदी सोपे वाटणारे गणित मात्र दिवसागणिक कठीण होत गेले. एकतर्फी वाटणारी निवडणूक मतदारांनी डोईजड केली. सत्ताधारी आणि वडिलोपार्जित राजकारणाचा वारसा व स्वतः दोन वेळा खासदार असणाऱ्या डॉ. हीना गावित व भाजपला मात्र रात्रीचा दिवस करावा लागला.

एक दशकानंतर काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला ताब्यात आला. ॲड. पाडवी कोण येथून सुरवात झाली होती. मात्र मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे मतदारांचा वाढता कल ॲड. पाडवी यांच्या पथ्यावर पडला. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हीना गावित यांच्या परिवारावर नाराज गटाने ॲड. पाडवी यांच्या बाजूने प्रचाराची धुरा सांभाळली.

त्यामुळे सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक खूप चुरशीची झाली. त्यामुळे विक्रमी मतदान झाले. लोकसभा नंदुरबार मतदारसंघासाठी झालेल्या मतदानात विधानसभा नवापूर मतदारसंघात दोन लाख ३२ हजार ५७९ मतदारांनी हक्क बजावल्याने ८०.१८ टक्के मतदान झाले. नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाल्याने ॲड. पाडवी यांच्या पथ्यावर पडले.

अशी मते...अशी आघाडी

नवापूर शहरात खासदार ॲड. गोवाल पाडवी यांना आठ हजार ८९८६ मते मिळाली, तर डॉ. हीना गावित यांना आठ हजार १५९ मते मिळाली. शहरात ८२७ मतांची आघाडी मिळाली. विसरवाडी शहरातून डॉ. गावित यांना एक हजार १३३ मते मिळाली, तर ॲड. पाडवी यांना एक हजार ४४८ मते मिळाली.

ॲड. पाडवी यांना ३१५ मतांची आघाडी मिळाली. खांडबारा येथून डॉ. गावित यांना एक हजार ४१० मते मिळाली, तर ॲड. पाडवी यांना एक हजार ६४५ मते मिळाली. खासदार गोवाल पाडवी यांना २३५ मतांची आघाडी मिळाली. चिंचपाडा गावातून हीना गावित यांना एक हजार ६०४ मते मिळाली, तर ॲड. पाडवी यांना दोन हजार १०२ मते मिळाली. काँग्रेस उमेदवार ॲड. पाडवी यांना ४९७ मतांची आघाडी मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT